लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था?

या लोकप्रिय अभिनेत्याचं 20 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. 

Updated: Nov 17, 2022, 08:39 AM IST
लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था? title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्या (Naga Shaurya) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शौर्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नागा शौर्या 20 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, नागा शौर्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी असून त्याची तब्येत बिघडल्यानं तो सेटवर बेशुद्ध झाल्याचे म्हटले जात आहे. (Naga Shaurya Health)

नागा शौर्य NS24 च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सेटवर अचानक नागा शौर्यची प्रकृती खालावली. त्याची तब्येत इतकी खालावली की तो सेटवरच बेशुद्ध झाला. यानंतर विलंब न करता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 4 दिवसांनी तो सप्तपदी घेणार आहे. अशा परिस्थितीत या बातमीनं चाहत्यांचा आणि कुटुंबियांचा त्याची काळजी वाटत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, नागा शौर्य त्याच्या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहे. त्यासाठी त्यांनं विशेष ट्रेनिंग घेतली आहे. असे देखील म्हटले जाते की अभिनेता पाण्याशिवाय आहार घेत (No Water Diet) होता. याचा अर्थ तो कोणत्याही प्रकारचं लिक्विड घेत नव्हता. शरीरात पाणी कमी असल्याने तो बेशुद्ध झाला. अभिनेत्यावर एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे. नॉन-लिक्विड डाएटवर असण्यासोबतच तो जिममध्ये तासनतास घाम गाळायचा. जेणेकरून लवकरात लवकर सिक्स पॅक बनवू शकता. सध्या नागा शौर्य याच्या प्रकृतीची ही माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा : Urmila Kothare झाली सायबर क्राइमची शिकार? फोटो शेअर करत केला खुलासा

20 नोव्हेंबर रोजी नागा शौर्य गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत सप्तपदी घेणार आहे. काही वेळापूर्वी अनुषा आणि नागा यांच्या लग्नाचे कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नागा शौर्या हे एक उत्तम अभिनेता तसेच लेखक आणि निर्माता म्हणून ओळखले जातात. 2011 मध्ये त्याने क्रिकेट, गर्ल्स अँड बिअर या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर नागा शौर्यनं पाठीवळून पाहिलं नाही. नागा शौर्यानं 'चंदामामा कथलू' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातही काम केलं आहे. नागा शौर्य लवकरच बरा होऊन आणि लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद लुटेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. (south actor naga shaurya faints on ns24 sets days before his wedding)