200 कोटींची नेट वर्थ, 'इतक्या' कोटींचा बंगला, 'ही' साउथ अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टाकते मागे

साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या चित्रपटांसोबतच नेट वर्थमुळे देखील चर्चेत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 24, 2024, 04:50 PM IST
200 कोटींची नेट वर्थ, 'इतक्या' कोटींचा बंगला, 'ही' साउथ अभिनेत्री कमाईच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टाकते मागे  title=

South actress : अभिनेत्री नयनतारा ही साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटांसाठी देखील मोठ्या प्रमाणात फी आकारत आहे. नयनताराचा टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये समावेश आहे. अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत देखील काम केलं आहे. शाहरुख खानसोबत तिने 'जवान' चित्रपटात काम केलं आहे. 
 
अभिनेत्री नयनतारा कमाईच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते. नयनताराची संपत्ती ही बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन, कियारा अडवाणी आणि श्रद्धा कपूर पेक्षा जास्त आहे. 

नयनताराच्या घराची किंमत 100 कोटी रुपये

रिपोर्टनुसार, अभिनेत्री नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे चेन्नईमध्ये एक आलिशान 4 बीएचके आहे. या घराची किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ती नवऱ्यासोबत विग्नेश शिवनसोबत राउडी पिक्चर्स हे प्रोडक्शन हाऊस चालवते.

नयनतारा लक्झरी जीवन जगते. तिच्याकडे खाजगी जेट देखील आहे. ती केरळला खाजगी जेटने जाते. आपल्या पालकांना भेटण्यासाठी ती सतत खाजगी जेटचा वापर करत असते. 

इतर ठिकाणी देखील नयनताराची गुंतवणूक

अभिनेत्री नयनतारा अभिनयासोबत एका स्किन केअर ब्रँडची मालक देखील आहे. ती तिच्या नवऱ्यासोबत तिचे स्किनकेअर ब्रँड 9Skin देखील चालवते. तिच्या या ब्रँडची उत्पादने भारत आणि मलेशियामध्ये विकली जातात. यासोबतच तिने सॅनिटरी नॅपकिनच्या ब्रँडमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ती लिप बाम कंपनी देखील चालवते. तिने दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्न केलं आहे. ती दोन जुळ्या मुलांची आई आहे. 

नयनताराकडे आहेत या कार

नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्याकडे आलिशान कार आहेत. ज्यामध्ये BMW 5 Series, Mercedes gls 350 D, BMW Series 7, Toyota Innova Crysta, Mercedes Maybach या सारख्या कार आहेत.