....म्हणून दाक्षिणात्य सुपरस्टार सेल्फ क्वारंटाईनमध्ये

हे संकट पाहता..... 

Updated: Mar 23, 2020, 05:24 PM IST
....म्हणून दाक्षिणात्य सुपरस्टार सेल्फ क्वारंटाईनमध्ये
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  कोविड 19 किंवा Corona कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशा या परिस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचं  आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आव्हानाच्या परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी ओळखत प्रत्येक नागरिकाने त्याच अनुषंगाने कोणतंही पाऊल उचलणं अपेक्षित आहे. 

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक सेलिब्रिटी अशीच अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. कोरोनाचं अतिशय झपाट्याने होणारं संक्रमण पाहता या सुपरस्टारने स्वत:ला सेल्फ क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. 

जागतिक स्तरावर संकट होऊऩ बसलेल्या कोरोनाची दहशत पाहता सेल्फ क्वारंटाईन होणारा हा अभिनेता आहे, प्रभास. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानेच याविषयीची माहिती दिली. नुकतंच जॉर्जिया येथून आगामी चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून परतणाऱ्या प्रभासने इतरांना आपल्यामुळे कोणताही धोका पोहोचू नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे. 

'कोरोनाच्या या वाढत्या दहशतीमध्ये चित्रीकरणावरुन सुखरुप परतल्यानंतर मी सेल्फ क्लारंटाईन होण्याचा निर्णय घेतो आहे. मी आशा करतो की या परिस्थिती सुरक्षित राहण्यासाई तुम्हीसुद्धा आवश्यक ती काळजी घेतच असाल', असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं. 

Image result for PRABHAS zee

 
 
 
 

प्रभासने ही पोस्ट करताच त्याच्यावरही कोरोनाचं सावट आहे का, असा चिंतेत टाकणारा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. पण, सध्या त्याला असा कोणताही धोका नसून सावधगिरी बाळगण्यालाच तो प्राधान्य देताना दिसत आहे. 

'बाहुबली', 'साहो' या चित्रपटांतून झळकणारा हा दाक्षिणात्य सुपरस्टार येत्या काळात राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटातून झळकणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे या चित्रपटातून त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. असं असलं तरीही या चित्रपटाचं नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.