'डोण्ट वरी बी हॅपी' नाटकातून स्पृहाची माघार

मराठी सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीचे नाव आवर्जून घेतले जाते. नाटक, मालिका आणि सिनेमा या तीनही आघाडींवर ती सध्या आपल्या भूमिका दमदारपणे निभावतेय. ती जितकी मालिका तसेच सिनेमांमध्ये सक्रिय आहे तितकीच ती रंगमंचावरही आहे. 

Updated: Apr 10, 2018, 12:55 PM IST
'डोण्ट वरी बी हॅपी' नाटकातून स्पृहाची माघार

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीचे नाव आवर्जून घेतले जाते. नाटक, मालिका आणि सिनेमा या तीनही आघाडींवर ती सध्या आपल्या भूमिका दमदारपणे निभावतेय. ती जितकी मालिका तसेच सिनेमांमध्ये सक्रिय आहे तितकीच ती रंगमंचावरही आहे. 

डोण्ट वरी बी हॅपी या नाटकातील स्पृहाच्या अभिनयाचे कौतुक केले जात होते. मात्र या नाटकातून स्पृहाने माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. २१ तारखेला दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा २७५ वा प्रयोग असणार आहे. हा स्पृहाचा नाटकाचा शेवटचा प्रयोग असणार आहे. या प्रयोगानंतर या नाटकात नवी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. 

स्पृहा आणि उमेश यांनी फेसबुक लाईव्हद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. दरम्यान, स्पृहाच्या जागी कोणती अभिनेत्री या नाटकात असणार आहे हे उद्याप उघड झालेले नाहीये. याची घोषणाही २१ तारखेला केली जाणार आहे. 

डोण्ट वरी बी हॅपी हे नाटक सध्याच्या पती-पत्नी यांच्यातील नात तसेच ताणतणावावर आधारित आहे. याचं दिग्दर्शन अद्वैत दादरकरचे आहे.