मुंबई : सध्या एक नवा ट्रेण्ड सुरु आहे. हा ट्रेण्ड म्हणजे, देश-विदेशातील कलाकार एकत्र येणे. सगळेच कलाकार पॅन इंडियन सिनेमा आणि इथपर्यंत इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. मात्र जेव्हा एखाद्या भारतीय कलाकाराला हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम मिळतं तेव्हा त्याच्यासाठी आणि प्रत्येकासाठीच ही गोष्ट खूप मोठी असते. कोणत्याही भारतीय कलाकारचं हॉलिवूडमध्ये जाणं त्याच्या यशस्वीपणला चार चांद लावतो.
अनेक कलाकारांचं राष्ट्रीय सीमा ओलांडून हॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, एक अशी भारतीय सुपरस्टार आहे जिन्हे हॉलिवूडची खूप मोठी ऑफर नाकारली होती. ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग (Steven Spielber) यांच्या ज्युरासिक पार्कसाठी (Jurassic park) बॉलिवूड अभिनेत्रीला विचारण्यात आलं होतं. मात्र तिने ही ऑफर नाकारली होती.
श्रीदेवीने नाकारली होती 'ज्युरासिक पार्क'ची ऑफर
एवढा मोठा प्रोजेक्ट नाकरलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आहे. दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार आणि हिंदी सिनेमाची 'हवा हवाई'ला 1993 मध्ये एक्शन एडवेंचर 'ज्युरासिक पार्क'साठी विचारण्यात आलं होतं. मात्र तिने ही ऑफिर नाकारली. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीदेवीने ज्युरासिक पार्क नाकारण्यामागचं कारण सांगितलं होतं.
'ज्युरासिक' पार्क नाकरण्यामागे होतं हे कारण
अभिनेत्रीने आपला शेवटचा सिनेमा 2017 साली रिलीज झालेला 'मॉम'च्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा तिचा सहकलाकार अक्षय खन्नाने तिला हॉलिवूड ऑफर नाकरण्यामागचं कारण विचारलं तेव्हा तेव्हा श्रीदेवी यांनी सांगितलं की, 'त्यावेळी हॉलिवूड सिनेमा करणं वेगळी गोष्ट होती. आता ही अभिमानाची गोष्ट आहे.' याशिवाय त्यांचं मानणं होतं की, दिली गेलेली भूमिका जास्त खास नव्हती आणि ही एक बॉलिवूडमधील तिच्या पात्राला न्याय देणारी नव्हती.
शेवटी 'ज्युरासिक पार्क' सिनेमाला खूप यश मिळालं. आणि यानंतर याचा सिक्वल रिलीज झाला. इरफान खान या प्रसिद्ध फ्रेंचाइजीसोबत जोडला गेलेला पहिला भारतीय अभिनेता होता. श्रीदेवी यांनी केवळ हाच ज्युरासिक पार्क नाकारला नाही. तर काही वर्षांनी त्यांनी शाहरुख खानसोबत 'डर' चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत कबुलीही दिली होती.