राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांची उपस्थिती, ऐश्वर्या गैरहजर! हे सेलिब्रिटीही दिसले नाहीत…

गेले अनेक दिवस ऐश्वर्या अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यातच नुकताच राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या दिसली नाही.

Updated: Jan 22, 2024, 05:13 PM IST
राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांची उपस्थिती, ऐश्वर्या गैरहजर! हे सेलिब्रिटीही दिसले नाहीत… title=

मुंबई : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले. अनेक वर्षांनंतर या शुभ प्रसंगी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. या निमित्ताने बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंतच्या स्टार्सनी अनेक पोस्ट्स केल्या आहेत. आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून  हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते. 

तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. मात्र आता अशा अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या संपुर्ण देश राममय झाला आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे केवळ अयोध्यामध्येच नव्हेतर सगळ्या जनतेमध्ये हा रामसोहळा साजरा केला जातोय.  हा सोहळा आज प्रत्येकजण घरा-घरांत दिवाळीप्रमाणे हा सोहळा साजरा करत आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी अयोध्येत या भव्यदिव्य सोहळ्याला हजेरी लावली आहे. आता यात सगळ्यात पहिलं आणि मोठं नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. 

अमिताभ बच्चन यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांच्यासोबतच अभिनेता आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनने देखील हजेरी लावली आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओ पाहून अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, या सोहळ्याला ऐश्वर्या का आली नाही? कारण बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कपल या सोहळ्याला उपस्थित होते. मग ऐश्वर्या का नाही आली असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, जया बच्चन देखील उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या सोहळ्यात अमिताभ आणि अभिषेकच उपस्थित होते. तर अजून अनेक कलाकारही या सोहळ्याला दिसले नाही. ऐश्वर्या प्रमाणेच या कार्यक्रमाला अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, हृतिक रोशन याचबरोबर अनेक कलाकार दिसले नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्या अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्या गेले अनेक दिवस सुरु आहेत.
गेले अनेक दिवस ऐश्वर्या अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अनेकांच म्हणणं आहे की, या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर गेले अनेक दिवस हे कपल एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत नाहीये. याचबरोबर अनेक कार्यक्रमांना हे दोघं एकत्र दिसले नव्हते. त्यामुळे या अफवांनी जोर धरला होता. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, ही केवळ अफवा असून या दोघांमध्ये सगळं काही सुरळित आहे. त्यामुळे समोर येणाऱ्या बातम्या या केवळ अफवा आहेत