Sridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?

Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे. 

Updated: Aug 13, 2023, 09:01 AM IST
Sridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का? title=

Sridevi Unique Doodle: श्रीदेवीला बॉलिवूडची सुपरस्टार म्हटले जात असे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने तिने एक काळ चित्रपटसृष्टीवर राज्य केले.  24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये कौटुंबिक लग्नादरम्यान श्रीदेवीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान श्रीदेवी तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच नृत्यासाठी खूप प्रसिद्ध होती.  श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी मद्रासच्या मीनमपट्टी येथे झाला. त्यामुळे आजच्या तिच्या 60 व्या वाढदिवशी वेगळ्या पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. 
 
श्रीदेवीचे नाव श्री अम्मा यांगार अय्यपन होते हे सर्वांनाच माहीत आहे. तिने चित्रपटसृष्टीती तिला सर्वजण श्रीदेवी या नावानेच ओळखत असत. श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे. 

गुगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवीचा फोटो 

श्रीदेवी आजच्या दिवशी जन्मली होती. हे औचित्य साधून गुगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवीचा फोटो ठेवला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री श्रीदेवी डान्स करताना दिसत आहे. यासोबतच तिच्या आजूबाजूला तिच्या भूमिकेमुळे ओळखल्या जाणाऱ्या सिनेमाची झलक पाहायला मिळते. यासोबतच तिच्या नागिन या सुपरहिट चित्रपटातील पोजही पाहायला मिळत आहेत.

त्याकाळी चित्रपट सृष्टीवर पुरुषांचा पगडा भारी होता. पण श्रीदेवीने याला हादरा देत स्वत:चे विश्व निर्माण केले. श्रीदेवी तेव्हा एका चित्रपटासाठी 1 कोटींचं मानधन घ्यायची. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिक्स्टीन सावन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आगमन केलं. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. पण त्यानंतर 1983 मध्ये आलेला हिम्मतवाला या चित्रपटातून श्रीदेवीने (Sridevi) दमदार आगमन केलं. मग काय श्रीदेवीने मागे वळून पाहिले नाही एकापेक्षा एक हिट चित्रपटाचा तिने सपाटा लावला. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम केलं. 

काही काळासाठी श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. दरम्यान 15 वर्षांच्या ब्रेकनंतर 2013 मध्ये इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवीने आपली जादू कायम असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर 2018 मध्ये मॉम चित्रपटातील भूमिकेने तिने चाहत्यांचं मनं जिंकल. वयाच्या 54 व्या वर्षांपर्यंत श्रीदेवीने 300 कोटींची संपत्ती जमा केली. 3 आलिशान घरं, 7 गाड्या आणि लक्स, तनिष्काची ब्रँड अॅम्बेसेडर होते. पण 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला आणि बॉलिवूडसह भारतीयांना धक्का बसला.