कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’चा विजेता..ट्रॉफी, 20 लाख, आणि बरंच काही

मुंबईः 'लॉक अप' या रियालिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अखेर घोषित झाला आहे. लॉक अप शोचा पहिला विजेतेपदाचा मान मुनव्वरला मिळाला.

Updated: May 8, 2022, 07:53 AM IST
कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’चा विजेता..ट्रॉफी, 20 लाख, आणि बरंच काही title=

मुंबईः 'लॉक अप' या रियालिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अखेर घोषित झाला आहे. कंगना राणौतने मुनव्वर फारुकीला शोचा विजेता घोषित केलंय.मुनव्वर फारुकीला लोकांची सर्वाधिक मतं मिळाली आणि लॉक अप शोचा पहिला विजेतेपदाचा मान मुनव्वरला मिळाला.

नव्वर फारुकी हा सुरुवातीपासूनच या खेळाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात होते. 'लॉक अप' या शोचा विजेता मुनव्वर फारुकीला 20 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. यासोबतच त्याला एक आलिशान कारही मिळाली. शो जिंकल्यानंतर मुनव्वरने आपल्या चाहत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले. 

लॉक अपमध्ये प्रवेश घेताच मुनव्वरने आपली खरी बाजू खरी लोकांना दाखवली होती. तसंच संधी मिळताच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही धक्कादायक खुलासा केले होते. यामुळेच शोची ट्रॉफी जिंकण्यासोबतच मुनव्वरने लाखो लोकांची मनेही जिंकली आहेत. 

ग्रँड फिनालेदरम्यान, मुनावर फारुकी टॉप 3 फायनलिस्टमध्ये सामील झाला. कंगनाने सांगितले की, त्याला 18 लाखांहून अधिक मते मिळाली. यानंतर अंजली अरोरा आणि पायल रोहतगीही या यादीत सामील झाल्या. अंतिम फेरीदरम्यान, जेलर करण कुंद्रा याने अझा फल्लाह आणि शिवम शर्मा यांना टॉप 6 अंतिम स्पर्धकांमधून वगळले. दोघांनीही शोमधील सर्व स्पर्धकांना खडतर स्पर्धा दिली, पण फिनालेमध्ये पोहोचल्यानंतर ते बाहेर पडले.