Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'स्त्री 2' चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे अडीच महिने झाले आहेत. अशातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. 'स्त्री 2' चित्रपटासह 'भेडिया' आणि 'मुंज्या' हे चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या तिन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अभिषेक बॅनर्जीने भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये त्याने जना ही एक खास व्यक्तिरेखा साकारली आहे. जी सर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.
'स्त्री 2' चित्रपटासह हे दोन चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
'स्त्री 2', 'भेडिया' आणि 'मुंज्या' या चित्रपटांच्या री-रिलीजबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला की, एखादा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणे हा खूप मोठा सन्मान आहे. मात्र, जर एकाच वेळी तीन चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत असतील त्याचा आनंद कोणाला सांगणे हे खूप कठीण आहे. 'स्त्री 2' आणि 'मुंज्या' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळाले.
या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखेचं माझ्या ह्रदयात विशेष स्थान आहे. मॅडॉक युनिव्हर्सचा एक भाग बनणे त्याच्यासाठी खूप रोमांचक आहे.
या प्रत्येक चित्रपटांची स्वत: ची एक वेगळी ओळख आहे. कॉमेडी आणि हॉररने भरलेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाण्याची खेचले आहे. एक अभिनेता म्हणून मी अशा भूमिका साकारण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. मी प्रयत्न करतो. मला आव्हान देणारे चित्रपट बनवा. या चित्रपटांनी मला कॉमेडी-हॉरर चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट
'स्त्री 2' हा चित्रपट अमर कौशिक दिग्दर्शित मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने 840 कोटी रुपयांची कमाई करून ब्लॉकबस्टर किताब पटकावला आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
BOT
(20 ov) 102/9
|
VS |
LES
96/8(20 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 102/9
|
VS |
OMA
96/8(20 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.