बेस्टीसोबत सुहानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 16, 2018, 07:53 PM IST
बेस्टीसोबत सुहानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटोंमुळे कायम चर्चेत असते. तिचे आऊटींग, पार्टीचे फोटोज सोशल मीडियावर लक्षवेधी ठरतात. आता पुन्हा एकदा सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुहाना आणि शनाया

सुहानाला पुन्हा एकदा पार्टीत स्पॉट करण्यात आले. सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरमध्ये चांगली मैत्री आहे. अनेकदा त्या दोघी एकत्र दिसतात. पुन्हा एकदा सुहाना आणि शनाया एका पार्टीत एकत्र दिसल्या. दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

Suee with shanaya  #Bestiegoals

A post shared by suhana khan (@suhanakha2) on

ट्रेडिशनल लूकची चर्चा

यापूर्वी सुहानाचा ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिल्लीतील एका नातेवाईकांच्या कार्यक्रमातील हा फोटो होता. यात सुहाना एका गुलाबी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. हा लेहंगा सीमा खानने डिझाईन केला होता. यात सुहानाची फुलांची बिंदी आकर्षक दिसत आहे.

 

I smile when I see you smile 

A post shared by suhana khan (@suhanakha2) on