सुशांतमागोमाग बिहारच्या आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

ही हत्या असल्याचा कुटुंबीयांचा संशय

Updated: Sep 29, 2020, 04:34 PM IST
सुशांतमागोमाग बिहारच्या आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या  title=

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रेयेथील राहत्या घररी गळफास घेवून या जगाचा निरोप घेतला. सुशांतमागोमाग आता बिहारच्या आणखी एका अभिनेत्याने आपला जीवन प्रवास संपवला आहे. बिहारमधील नवोदित कलाकाराचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाला आहे. अक्षत उत्कर्ष असं मृत पावलेल्या अभिनेत्याचं नाव आहे. तो मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून अक्षत मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.  

अक्षतचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबानी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अक्षतच्या आत्महत्येमुळे कलाविश्वात मोठी खळबळमाजली आहे. आत्महत्येपूर्वी रात्री ९  वाजता तो त्याच्या वडिलांसोबत बोल्ला होता. परंतु मध्यरात्री त्याच्या मृत्यू बातमी मिळाली असल्याची माहिती अभिनेत्याच्या मामा रंजीत सिंह यांनी दिली. 

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न केल्याचं वक्तव्य करत त्यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. शिवाय त्याने आत्महत्या कशी केली हे देखील स्पष्ट झालेलं नाही. काही वेळेपूर्वी अक्षतचा मृतदेह मुंबई विमानतळावरून पाटना येथे त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे. 

दरम्यान, सुशांत आत्महत्ये प्रकरणी सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. परंतू अद्यापही त्याच्या मृत्यूमागचे ठोस कारण समजू शकलेलं नाही, तर दुसरीकडे  आणखी एका बिहारच्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे.