Ayodhya Ram Mandir : 'कोटी जनांमधून मला निमत्रण यावं...', अभिनेता सुनील बर्वेचें अयोध्येतील फोटो समोर!

Sunil Barve Ram Mandir Ayodhya:  सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दाखवली अयोध्येतील एक झलक

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2024, 01:02 PM IST
Ayodhya Ram Mandir : 'कोटी जनांमधून मला निमत्रण यावं...', अभिनेता सुनील बर्वेचें अयोध्येतील फोटो समोर! title=
(Photo Credit : Social Media)

Sunil Barve Ram Mandir Ayodhya: आज संपूर्ण देशात राममय वातावरण झालंय. सगळी राम नामात मग्न झाले आहेत. आज अयोध्येत तर भक्तांची गर्दी झाली आहे. त्यात सेलिब्रिटींनी तर तिथे थेट हजेरी लावली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये आता एक मराठी अभिनेत्यानं देखील हजेरी लावली आहे. ते म्हणजे मराठमोळे अभिनेते सुनील बर्वे आहेत. सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सुनील बर्वे यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहून ते विमानानं प्रवास करत असल्याचे पाहायला मिळते. सुंदर सकाळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे की 'भल्या पहाटे मुंबईहून निघून लकनऊला उतरतोय! पहाटेची आकाशातून दिसणारी लख्खं सुर्यकिरणं, आणि खाली धुक्याची जाड चादर! नाटकाचा पडदा दूर होऊन पुढे काय पहाणार आहोत अनुभवणार आहोत याची उत्कंठा लागलिए! निघालोय अयोध्येला! अभूतपुर्व सोहोळा पहायला. अनेक कोटी जनांमधून मला निमत्रण यावं, भाग्यवान खरा!' त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून त्यांना निमंत्रण मिळाल्याचे समोर आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनील बर्वे यांच्या व्हिडीओवर सगळ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की 'क्या बात है!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'जय श्रीराम.. खरंच भाग्यवान.' तिसरा नेटकरी म्हणाला 'शुभास्ते पंथाना संतू..... आमचाही नमस्कार कराल... ' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खरंच ही पुण्यवान लोकांना चं मिळते आणि मी तुम्हाला खूप मानते.' तर अभिनेता शरद पोंक्षेनं कमेंट केली की खरच भाग्यवान आहेस मित्रा जय श्रीराम' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी 'या' 8 कलाकारांनी केलं 'इतकं' दान!

याशिवाय सुनील बर्वे यांच अयोध्येतील फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यांनी यावेळी सेल्फी काढले ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे फोटो सुनील बर्वे कलाकृती या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.