हार्ट सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हरचं पहिलं ट्विट, प्रकृतीबद्दल सांगत म्हणाला....

हार्ट सर्जरीनंतर काय म्हणाला सुनील ग्रोव्हर?  

Updated: Feb 11, 2022, 08:46 AM IST
हार्ट सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हरचं पहिलं ट्विट, प्रकृतीबद्दल सांगत म्हणाला.... title=

मुंबई : इंडस्ट्री अनेक कलाकार आहेत आणि त्यांचे न मोजता येणारे चाहते. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता आणि विनोदवीर सुनील ग्रोव्हर. गेल्या काही दिवसांपासून हृदयविकारामुळे सुनीलला मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनीलची हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. प्रकृती कारणामुळे सुनीन शुटिंग आणि सोशल मीडियापासून दूर होत.

पण हार्ट सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हरने ट्विट केलं आहे. तो ट्विट करत म्हणाला, 'भाई ट्रीटमेंट ठीक हो गया, मेरी चल रही है हीलिंग, आप सब की दुआओं के लिए, ग्रैटीट्यूड है मेरी फीलिंग! ठोको ताली!' अशा विनोदीअंदाजात सुनिलने चाहत्यांचं आभार मानले. 

दरम्यान, सुनीलने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दाखल केल्यानंतर कळालं सुनीलाले हृदयविकाराचा धक्क बसला होता. 

शिवाय सुनील कोरोना व्हायरसच्या विळख्यातही सापडला होता. त्यानंतर अभिनेता सलमान खानने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनीलच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.