Sunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर

Ahan Shetty च्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील काही खास आणि अनसीन फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Feb 4, 2023, 06:14 PM IST
Sunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर

Ahan Shetty's Girlfriend Shared Unseen Photo's Of Athiya and KL Rahul's Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) काही नुकतेच लग्न बंधनात अडकले होते. त्यांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या लग्नातील आणि त्या आधीच्या सगळ्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्या दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांचा मुलगा अहान शेट्टीच्या (Ahan Shetty) गर्लफ्रेंडनं वेधलं आहे. अहनाच्या गर्लफ्रेंडनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

अहानच्या गर्लफ्रेंडचं नाव तानिया श्रॉफ (Tania Shroff) असे आहे. तानियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. तानियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्यात आणि अथिया शेट्टीमध्ये असलेलं बॉन्ड पाहता येत आहे. कधी ती अथियासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसते तर कधी स्टायलिश अंदाजात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तानियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये कळते की तिनं अथिया आणि केएल राहुलच्या लग्नालाच नाही तर त्याआधी असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये देखील हजेली लावली होती. तानियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अथिया आणि केएल राहुलला हजेरी लावताना दिसत आहे.  

हेही वाचा : काहीही हा श्री...; 'होणार सून मी ह्या घरची' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

कोण आहे तानिया श्रॉफ

तानिया श्रॉफ ही एक फॅशन डिझायनर आणि इन्फ्लुएन्सर आहे. तानियाचा जन्म 29 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील जयदेव श्रॉफ हे उद्योजक आहेत. दरम्यान, तानिया आणि अहान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. तर गेल्या 10 वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यासोबतच त्या दोघांनी एकाच शाळेत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तानिया पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अथियाविषयी बोलायचे झाले तर तिनं 2015 साली बॉलिवूडमध्ये सूरज पांचोलीसोबत पदार्पण केले. त्या दोघांनी हीरो या चित्रपटातून एकत्र पदार्पण केलं होतं. त्यानंतर अथिया मुबारकान या कॉमेडी चित्रपटात दिसली. याशिवााय तिनं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर या चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटात ती सगळ्यात शेवटी दिसली होती. अहान शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर, तो पहिल्यांदाच तारा सुतारियासोबत तडप चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट तेलगू चित्रपट RX 100 चा हिंदी रिमेक होता.