सनी लिओनीचा पुन्हा मोठा अपघात, आता ओठ फुटल्याचा व्हिडिओ समोर

त्यात आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

Updated: Mar 15, 2022, 05:56 PM IST
  सनी लिओनीचा पुन्हा मोठा अपघात, आता ओठ फुटल्याचा व्हिडिओ समोर title=

मुंबई : सनी लिओनी ही तिच्या सौंदर्यासोबतच क्यूटनेस आणि अॅक्टीव्ह अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती अनेकदा चाहत्यांसाठी मनोरंजक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यात आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सनी लिओनीच्या डोक्यापासून पायापर्यंत रक्तस्त्राव होताना दिसत आहे. तिच्या ओठांना देखील दुखापत झाली आहे. आणि तिच्या गुडघ्याला सुद्धा मार लागला आहे. ती पट्टी बांधताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच अनेक चाहते नाराज झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीला लवकरच ठीक होण्यास सांगत आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये विचारले की, 'बेबी डॉलचे काय झाले?'  हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर सनी लिओनीचा व्हिडिओ शुटींगदरम्यानचा आहे. हा तिच्या शूटशी संबंधित व्हिडिओ आहे. अनामिका या सीरीज दरम्यानचा हा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.