बिहार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत सनी लिओनी उत्तीर्ण

मेरिट लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर सनीचे नाव आहे.

Updated: Feb 21, 2019, 01:51 PM IST
बिहार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत सनी लिओनी उत्तीर्ण title=

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी जर बिहारमध्ये नोकरी करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका...कारण बिहार राज्यसेवा आयोगाने घेतलेल्या कनिष्ठ अभियंता भर्तीचा प्राथमिक निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत अभिनेत्री सनी लिओनी पहिली आली असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या या निकालात सनीला ९८.५ गुण मिळाले आहेत. दरम्यान हा निकाल पाहून अधिकारी आश्चर्यचकीत झाले असून हा निकाल अंतिम नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बिहारच्या ऑनलाईन भर्ती प्रक्रियेची चेष्टा करण्यासाठी कोणीतरी खोड काढल्याचा दावा अधिकारी करत आहेत. 

बिहार राज्य सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यात एकूण १७९११ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पाठवले होते. उमेदवारांनी पाठवलेल्या अर्जाच्या आधारे एक मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. याच लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.  

या चुकीच्या लिस्टनंतर आता पुन्हा नवीन लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. पुन्हा  उमेदवारांनी पाठवलेल्या अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर योग्य तो अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.