close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गरीब विद्यार्थ्यांवर आयआयटीसाठी पात्र बनवण्याच्या धडपडीवर आधारीत, 'सुपर ३०' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'सुपर ३०' चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 

Updated: Jun 4, 2019, 04:08 PM IST
गरीब विद्यार्थ्यांवर आयआयटीसाठी पात्र बनवण्याच्या धडपडीवर आधारीत, 'सुपर ३०' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : 'जब समय आयेगा, तब सबसे बडी छलांग हम ही मारेंगा...' लहान मुलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न, लहान डोळ्यांना मोठे स्वप्न पाहाण्यासाठी असलेले अधिकार, कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती 'सुपर ३०' चित्रपटाची कथा फिरत आहे. अभिनेता हृतिक रोशन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 
  

अभिनेता हृतिक रोशनने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. 'सुपर ३०' चित्रपटाचा जगातील प्रसिद्ध फिल्म वेबसाईट 'आईएमडीबी'च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सुपर ३०' चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.     

हृतिक म्हणाला की 'चित्रपटाची कथा एका इसमाच्या खऱ्या आयुष्यावर आधारलेली आहे. ज्याने शिक्षणाच्या जोरावर स्वत:च्या स्वप्नांना पूर्ण केले आहे.' 'सुपर ३०' चित्रपट गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. आनंद कुमार हे आयआयटी-जेईई या स्पर्धा परिक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना बिहारमध्ये मोफत प्रशिक्षण देतात.