Video: लग्नानंतर आणखी हॉट दिसतेय ही अभिनेत्री, बॅकलेस ड्रेसवर पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री हॉट व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत.

Updated: Sep 2, 2022, 09:00 PM IST
Video: लग्नानंतर आणखी हॉट दिसतेय ही अभिनेत्री, बॅकलेस ड्रेसवर पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : आपल्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असलेली सुंदर अभिनेत्री मौनी रॉय आजकाल आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओंसह चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. आता अशा परिस्थितीत मौनी रॉयचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मौनीच्या मनमोहक स्टाईल पाहून तिचे चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये मौनीने सुंदर ड्रेस परिधान केला आहे. बॅकलेस ड्रेसमुळे अभिनेत्री ग्लॅमर वाढवत आहे. प्लंगिंग नेकलाइनने मौनीच्या लूकमध्ये भर घातली. याशिवाय तिने सॉफ्ट कर्ल्स, न्यूड मेकअप आणि मॅचिंग हील्ससह तिचा जबरदस्त लुक पूर्ण केला. मौनीने आज हा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आत्तापर्यंत त्याला जवळपास 90 हजार लाईक्स मिळाले आहेत. चाहते सतत कमेंट्सद्वारे मौनी रॉयच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉयच्या (Mouni Roy) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ही अभिनेत्री अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra)चित्रपटात सशक्त भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्याशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्ट, (Alia Bhatt) नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट या महिन्याच्या ९ तारखेला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.