Video : शाहरुखचा लाडका AbRam लालबागच्या राजाच्या दर्शनाला, व्हीडिओ व्हायरल

AbRam Video : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान  (AbRam Khan) खूप लोकप्रिय आहे. 

Updated: Sep 2, 2022, 08:22 PM IST
Video : शाहरुखचा लाडका AbRam लालबागच्या राजाच्या दर्शनाला, व्हीडिओ व्हायरल title=

AbRam Video : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान  (AbRam Khan) खूप लोकप्रिय आहे. अबरामच्या गोड हास्यावर अनेक चाहते फिदा आहेत.   आता अबरामने 'गणेश चतुर्थी'च्या (Ganeshotsav 2022) निमित्ताने  मुंबईत 'लालबागच्या राजा'चं (LalbaugCha Raja) दर्शन घेतलं. अबरामने गुरुवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मात्र यावेळी अबरामचे वडील शाहरुख खान त्याच्यासोबत दिसले नाहीत. आता अबरामचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ganeshotsav 2022 shahrukh khan son abram khan visit lalbaugcha raja video viral on social media)

अबरामचा व्हीडियो व्हायरल 

अबराम शाहरुखचा पर्सनल बॉडीगार्ड रवीसोबत पोहोचला. अनेक चाहच्यांनी अबरामच्या या व्हीडिओला लाईक केलंय. रवी निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत होता.  तर अबराम पांढरा टी-शर्ट, ग्रे शॉर्ट्स और व्हाइट स्नीकर्स घातला होता.

शाहरुखच्या घरीही बाप्पा 

शाहरुखनेही 'मन्नत' या घरी  बाप्पाचं स्वागत केलं. शाहरुखने कुटुंबियांसह गणेश चतुर्थीचा साजरी केली. शाहरुखने इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केलं. ज्यात अबराम आणि शाहरुख बाप्पासोबत दिसत आहेत. 'मी आणि अबरामने गणपतीचं स्वागत केले.  मोदक खूप चविष्ट होते. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा", असं कॅप्शन दिलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

शाहरुख, जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) 'पठाण'मध्ये दिसणार आहेत. 'पठाण' सिनेमा 2023 मध्ये जानेवारीत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय किंग खान तापसी पन्नूसोबत (Taapsee Pannu) 'डंकी' चित्रपटात काम करत आहे.