अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचं सांगत ५० कोटींची मागणी करणाऱ्या महिलेला झटका

४५ वर्षीय करमानला मोडेक्स यांनी गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचं म्हटलं होतं

Updated: Jan 30, 2020, 12:43 PM IST
अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचं सांगत ५० कोटींची मागणी करणाऱ्या महिलेला झटका  title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दिलासा मिळालाय. न्यायालयानं तिरुवनंतपुरम कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर रोख लावलीय. सोबतच याचिकाकर्त्या करमाला मोडेक्स यांनाही नोटीस जारी करण्यात आलीय. ४५ वर्षीय करमाला मोडेक्स यांच्या दाव्यानुसार, अनुराधा पौडवाल आणि त्यांचे पती अरुण पौडवाल हे त्यांचे जैविक माता-पिता आहेत.

तिरुवनंतपुरमच्या (केरळ) रहिवासी असणाऱ्या ४५ वर्षीय करमानला मोडेक्स यांनी गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचं म्हटलं होतं. करमाला यांनी कौटुंबिक न्यायालयाकडे धाव घेत अनुराधा पौडवाल यांच्याकडे ५० करोड रुपये नुकसान भरपाईचीही मागणी केली होती.

यावर अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया देताना, अशा दर्जा नसलेल्या वक्तव्यांवर उत्तर देणं माझ्या मर्यादेच्या पलिकडचं आहे असं म्हटलं होतं. मात्र, अनुराधा पौडवाल यांच्या प्रवक्त्यांनी करमाला यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं म्हटलं होतं.

१९७४ मध्ये अनुराधा पौडवाल यांची मुलगी कविता हिचा जन्म झाला होता. अशावेळी करमाला कुठून आली. अनुराधा यांच्या पतीचा उल्लेख करणाऱ्या या मुलीला हेहे माहीत नाही की ते आता या जगात नाहीत. करमाला अनुराध यांची मुलगी असेल तर तिनं अनुराधा यांना पैसे द्यायला हवेत, ५० करोडची मागणी करायला नको, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

पाच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मला हे सत्य माझ्यासमोर ठेवलं की माझी खरी आई अनुराधा पौडवाल आहेत. मी चार दिवसांची होते तेव्हा त्यांनी मला माझ्या पालक माता-पित्यांकडे सोपवलं होतं. माझे पालक पिता आर्मीमध्ये होते. ते अनुराधा पौडवाल यांचे मित्र होते. त्यानंतर त्यांची बदली मुंबईला झाली. अनुराधा यांनी हे पाऊल यासाठी उचललं कारण त्यावेळी त्या आपल्या गायनाच्या करिअरमध्ये बिझी होत्या. त्यावेळी माझी जबाबदारी उचलण्याची त्यांची तयारी नव्हती, असं करमाला यांचं म्हणणं होतं. 

आपण अनुराधा पौडवला यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कधीही आपली भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर अनुराधा यांनी करमाला यांचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. त्यानंतर आपण कोर्टात धाव घेतल्याचं करमाला यांनी म्हटलं होतं.