मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुप्रिया पाठरेने केलं चाहत्यांना आव्हान; व्हिडीओ व्हायरल

 नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Updated: Jun 1, 2024, 01:52 PM IST
मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुप्रिया पाठरेने केलं चाहत्यांना आव्हान; व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई :  अभिनेत्री सुप्रिया पाठारे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा ही अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एखादी पोस्ट अभिनेत्रीने शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.  या व्हिडीओतून त्यांनी वाहतूक कोंडी झाल्यामुळे झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला आहे. 

सुप्रिया पाठारे व्हिडीओत म्हणाल्या, “नमस्कार मी सुप्रिया पाठारे, माझं शूटिंग मढला असतं. मी आता ठाण्यावरून सकाळी आठ वाजता निघाले आणि आता साडे बारा झालेत. तरी अजूनही मी मढला पोहोचलेली नाही. प्रवासात मला पाच तास होऊन गेलेले आहेत. घोडबंदर रोड पूर्णपणे जाम आहे. एक-एक तास गाड्या एका जागी थांबवून ठेवत आहेत आणि मुलूंड-ऐरोलीच्या ब्रीजच्या इथे कुठेतरी कंटेनर पलटी झालाय म्हणून तिथेही वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका कारण खाण्या-पिण्याचे खूप हाल होतायत आणि दुसरी गोष्ट नाटकवाल्यांसाठी त्यांचा प्रयोग असेल चार किंवा साडे चारला तर त्यांनी प्लीज वेळेत निघा. कारण खूप वाहतूक कोंडी आहे सगळीकडून तर तुम्ही अडकायला नको म्हणून…धन्यवाद.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी सुप्रिया पाठारेच्या व्हिडीओवर कमेंट करत  काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर अनेकांनी मात्र ट्रोल केलंय. एकाने कमेंट करत लिहीलं,  3 दिवस तुम्ही पण आराम करायचं ना मॅडम काय माहिती आजुन किती ट्रॅफिक होईल ते. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं, अवजड वाहने बंद केले तर हलके वाहने आरामात जाऊ शकतात आणि सरकारी बस पण जाऊ शकतात पण वाहतूक. नियत्रंण विभाग अवजड वाहने बिन्धास्त पने जाऊ देत असल्याने वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत आहे. तर अजून एकाने म्हटलंय,ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक होत आणि ती तुम्ही पोहोचवली धन्यवादतर अजून एकाने लिहीलंय, आजच सुट्टी भेटली... फिरण्याचा बेत होता , कॅन्सल केला. तर अजून एकाने लिहीलंय, तुम्ही 5 तास होता ट्रॅफिक मध्ये मी 7 तास अडकून होतो. तर अजून एकजण म्हणतोय,असुद्या आम्ही रोजच काळजी घेतो आणि रोजच बाहेर पडतो. तुमच्या सारख्या कलाकारांकडून बाकी काही अपेक्षाच नाहीत. कारण तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही लगेच व्यक्त होतात. इतर वेळी कधी सामान्य लोकांना त्रास होतो त्यावेळी तुम्ही आरामात असतात. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स या व्हिडीओवर करत आहेत. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.