सत्यघटनेवर आधारित 'फुली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

उत्तराखंड मध्ये  राहणारी फुली ही १४ वर्षांची हुशार आणि तेजस्वी मुलगी आहे, जिला शिक्षणाची खूप आवड आहे. 

Updated: Jun 1, 2024, 01:11 PM IST
सत्यघटनेवर आधारित 'फुली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : फिल्मसृष्टी मध्ये सत्य घटनांवर आधारित चित्रपट सतत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशीच एका लहान मुलीची मोठी स्वप्न असलेली, अभिनेता दिग्दर्शक अविनाश ध्यानी यांचा 'फुली' हा चित्रपट  ७ जून ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. झी म्युझिकद्वारा  'फुली' चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज रिलीज करण्यात आला आहे, ज्याला प्रेक्षकांनकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वर्गात रोल नंबर १२ जो सतत अबसेन्ट असतो. या नंबर च्या घोषणेने 'फुली' चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला पाहायला मिळेल. उत्तराखंड मध्ये  राहणारी फुली ही १४ वर्षांची हुशार आणि तेजस्वी मुलगी आहे, जिला शिक्षणाची खूप आवड आहे. जिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. पण तिच्या जीवनातील दुःख आहे तिचे वडील, जे दारूच्या आहारी गेले आहेत. जे तिला सतत शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण करतात. ह्या अडचणीमुळे तिचा आत्मविश्वास कमी होत असताना तिच्या जीवनात एका जादूगरची एन्ट्री होते. तो तिला समजावतो की आपल्या आयुष्यात कोणीही जादूगर जादू करू शकत नाही तर ती जादू तुम्हाला स्वतःच स्वतःच्या आयुष्यात करावी लागते." हा संवाद फुली च्या आयुष्यात कसा बदल घडवून आणतो हेच ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 

या चित्रपटातील फुली या व्यक्तिरेखेद्वारे दिग्दर्शक अविनाश ध्यानी यांनी डोंगरात राहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आणि स्त्रीच्या जीवनातील सत्य सामोरे आणले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते टिमली गावात (पौरी जिल्हा) सुमारे 8 महिने राहून त्यांनी हा चित्रपट बनवला.   अविनाश ध्यानी यांनी आपल्या करियर मध्ये अनेक चित्रपट बनवले आहेत पण फुली त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. कारण फुली ही एक लहान मुलीची वास्तविकता आहे. फुली या चित्रपटाची आखणी करताना त्यांनी आपल्या आईसह अनेक पर्वतीय महिलांच्या जीवनातून प्रेरणा घेतली असून, पर्वतांना जवळून अनुभवले आहे.

चित्रपटाचे निर्माते अविनाश ध्यानी सांगतात की, फुली आपल्याला काहीतरी शिकवून जाणार आहे. फुली जरी एका मुलीची कथा असली तरी तिच्या जीवनातील अडचणी ह्या आपल्या जीवनाशी जोडताना दिसतील. त्यामुळेच हा चित्रपट आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे आणि तो सर्वानी पाहणे गरजेचे आहे. हा चित्रपट ७ जूनला थिएटरमध्ये  प्रदर्शित होत आहे. 

पद्मसिद्धी फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या फुली चित्रपटात अविनाश ध्यानी, सुरुची सकलानी, नवोदित रिया बालोनी, प्रिन्स ज्वेल, निधी बालोनी आदी कलाकार आहेत. मनीष कुमार, अविनाश ध्यानी, ललित जिंदाल, राजीव शर्मा, मनोज कुमार सिंग निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती संजय अग्रवाल, रवींद्र भट्ट, मोहित त्यागी आणि स्मृती हरी यांनी केली आहे. अलका याज्ञिक, नक्काश अझीझ, राजा हसन आणि ध्रुव कुमोला यांच्या सुमधुर आवाजात  काही हृदयस्पर्शी गाणी आहेत.