Supriya Pathare on Maharaj Hotel: अनेक मराठी कलाकरांच्या मुलांनी आपलं स्वत:ची अशी हॉटेल्स काढली आहेत. शशांक केतकरच्या 'आईच्या गावात' या हॉटेलची चर्चा होती. आता 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील अभिनेत्रीनंही मालिका संपल्यानंतर आपलं स्वत:च नवं हॉटेल सुरू केलं आहे. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या या नव्या हॉटेलची झलकही चाहत्यांसमोर आणली आहे. 'वदनी कवळं' असं तिच्या या नव्या हॉटेलचं नाव आहे. सोबत सध्या अनेक मराठी सेलिब्रेटीही तिच्या या नव्या हॉटेलला भेट देताना दिसत आहेत. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्याही हॉटेलची जोरात चर्चा आहे. सुप्रिया पाठारे या मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाचे सदैव कौतुक होताना दिसते. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याचेही स्वत:चे हॉटेल आहे.
त्यानंही स्वत:चा फूड ट्रक सुरू केला आहे. त्याच्या या आगळ्यवेगळ्या वाटेचे सर्वांकडून कौतुकही झाले होते. त्याचे 'महाराज हॉटेल' इतके दिवस फार चांगले सुरू होते परंतु आता ते बंद होण्याच्या मार्गावर आहे का अशीही सोशल मीडियावरून चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांमध्ये अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी इन्टाग्रामवरून काल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'महाराज हे हॉटेल उद्यापासून सुरू होत आहे. तेव्हा नक्की भेट द्या.' त्याच्या या हॉटेलला अल्पवधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
सुप्रिया पाठारे यांचा मुलगा हा सिनेसृष्टीत सक्रिय नसून त्यानं हॉटेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर निवडलं आहे. त्याला त्याच्या या वेगळ्या करिअरसाठी त्याच्या कुटुंबियांचा पाठिंबा होता. तो प्रोफेशनल शेफ आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर यांच्या शोमध्येही तो झळकला होता. त्यानं अमेरिकेतही शेफचं काम केले आहे. त्यानं हे छोटंसं स्टार्टअप सुरू केलं आहे. हे हॉटेल बंद होणार का अशीही चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात सुप्रिया पाठारे यांना फोनही येण्यास सुरूवात झाली होती. यावेळी सुप्रिया पाठारे यांनी त्यांचे हॉटेल बंद न झाल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : 'आता लग्न नको', म्हणणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं तेलुगू अभिनेत्यासोबत सिक्रेट अफेअर? शेवटी हिंट मिळालीच
सुप्रिया पाठारे म्हणाल्या, 'मिहीरनं काही महिन्यांपुर्वीच ठाण्यात खेवरा सर्कलमध्ये महाराज हॉटेल सुरू केलं. येथे स्पेशल पावभाजी मिळते. हे हॉटेल गेल्या 10-15 दिवसांपासून बंद होतं. त्यामुळे हे हॉटेल बंद झाल्याचं म्हटलं जात होतं. मला आणि माझ्या मुलाला यासंदर्भात अनेकांचे फोनही आहे. परंतु असं काहीच नाहीये. 21 ऑक्टोबर रोजी माझ्या आईचं निधन झाले. आईचं निधन झाल्यानं आम्ही हॉटेल बंद ठेवलं होतं. कालच आईचं कार्य झालं. बिझनेस आहे तो सूरू ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे 3 तारखेपासून पुन्हा हॉटेल सुरू होणार आहे. सगळ्यांनी नक्की या.' असं सुप्रिया या व्हिडीओत म्हणाल्या आहेत.