'आता लग्न नको', म्हणणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं तेलुगू अभिनेत्यासोबत सिक्रेट अफेअर? शेवटी हिंट मिळालीच

Mrunal Thakur Marriage: सध्या मृणाल ठाकूर या अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे. तिच्या लग्नाची आजकाल जोरात चर्चा आहे. आपल्या करिअरच्या पीकवर असलेली ही अभिनेत्री आता लवकरच लग्न करणार आहे का अशी कुजबूज सुरू झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 3, 2023, 01:25 PM IST
'आता लग्न नको', म्हणणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं तेलुगू अभिनेत्यासोबत सिक्रेट अफेअर? शेवटी हिंट मिळालीच title=
is mrunal thakur getting married soon producers gives hint latest trending entertainment news in marathi

Mrunal Thakur Marriage: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या रिलेशनशिप्सची. कधी कोण कोणाबरोबर स्पॉट होते आहे आणि कधी कोणासोबत कुठे दिसली... बापरे नाना तऱ्हेचे प्रश्न हे चाहत्यांना पडत असतात. मग त्यांचे लिंक अप करायलाही सुरूवात होते. हल्ली चाहत्यांना असाही प्रश्न पडतो की आता अभिनेत्रींचे वय वाढू लागले आहे. 30 शी ओलांडली आहे तेव्हा लग्नाचे काय? या अभिनेत्रींच्या घरच्यांकडूनही विचारणा होऊ लागते. त्यातून करिअर सांभाळून आपलं घरंही सांभाळण्याचा प्रयत्न अभिनेत्री करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. 31 व्या वर्षी ही अभिनेत्री सध्या आपल्या करिअरच्या पीकवर आहे. परंतु सध्या तिची चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे तिच्या लग्नावरून. 

या अभिनेत्रीचं नावं आहे मृणाल ठाकूर. मृणाल ही मराठमोळी अभिनेत्री आहे. तिचा जन्म धुळ्याचा आहे. तिनं अनेक हिंदी मालिकांतून तसेच चित्रपटांतून कामं केली आहेत. आपल्या करिअरची सुरूवात तिनं हिंदी मालिकांपासून केली होती. 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून तिच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून स्तुती करण्यात आली होती. त्यानंतर तिला बॉलिवूडचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिच्या लोकप्रियतेत आणखीच वाढ झाली. आज ती तरूणाई भुरळ पाडते आहे. नुकतीच ती 'मेड इन हेवनच्या सीझन 2' मध्ये दिसली होती. 'लव्ह सोनिया' हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तिनं 'लस्ट स्टोरीज 2', 'तूफान', 'जर्सी', 'सुपर 30', 'बाटला हाऊस' अशा अनेक चित्रपटांतूनही कामं केली आहेत. 'सुपर 30' या चित्रपटानंतरही तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 

हेही वाचा : लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लग्नाची. लवकरच मृणाल ठाकूर ही लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. ती तेलुगू अभिनेत्याच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. 'न्यूज 18' च्या रिपोर्टनुसार सध्या ती रिलेशनशिपमध्ये आहे आणि आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार करते आहे. याचा अर्थ ती लवकरच लग्न करू शकते. 

तिच्या लग्नाची चर्चा ही फिल्म निर्माता अल्लू अरविंद यांच्या एक स्टेटमेंटनंतर होयला लागली आहे. त्यांनी एका अवोर्ड फंक्शनमध्ये तिच्या लग्नाबद्दल हिंट दिल्याची चर्चा आहे. या अवोर्ड शोमधून तिला चित्रपट 'सीता रामम'साठी बेस्ट फीमेल एक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी अरविंद यांनी तिला 'तू लवकरच लग्न कर' असा आशीर्वीद दिला. यावेळी ते म्हणाले की, 'मला वाटतं की मृणाल हैद्राबादमध्ये सेटल व्हावी.' तेव्हा यावरून तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे ती तेलुगू अभिनेत्याच्या प्रेमात आहे का असे तर्क लावायला सुरूवात झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या तरी तिनं आपल्या कोणत्याच नात्यावर पुष्टी केलेली नाही. मध्यंतरी तिनं 'इंडिया टूडे'च्या एका मुलाखतीत आपले लग्नाविषयीचे विचार मांडले होते. ती म्हणाली की लग्नावर तिचा विश्वास आहे परंतु जेव्हा कोणी मिस्टर राईट मिळेल तेव्हा वाट न पाहता लग्न करावे. सध्या तिचा 'आंख मिचोली' हा शर्मन जोशीसोबतच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.