मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावरून सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने रियावर निशाना साधाला आहे. रियाने आपल्या भावाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुशांतच्या बहिणीने केला आहे. सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून रियावर निशाणा साधला आहे.
श्वेता सिंह किर्ती ट्विट करत म्हणाली की, 'टीव्हीच्या माध्यमातून मृत्यूनंतर माझ्या भावाची प्रतिमा मलिन करण्याची हिंमत तुझी झालीच कशी. तुला वाटत आहे देव तुझे कृत्य पाहता नाही. मला देवावर पूर्ण विश्वास असल्याचं देखील ती म्हणाली.
You have guts to come on National Media and tarnish the image of my pure brother after his death!! You think God is not watching for what you have done! I believe in God and I have faith, now I really want to see what he will do to you. #Godiswithus #JusticeForSushantSinghRajput
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 27, 2020
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा ऍन्गल समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचीही यात एन्ट्री झाली आहे. रियाच्या ड्रग्ज ऍन्गलवरून देखील सुशांतची बहिण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे.
I wish Bhai would have never met that girl at all!! Drugging someone without his consent and then convincing him that you are not well, taking him to the psychiatrists... what level of manipulation is this!! How will you ever redeem your soul!!! You are so done!! #ArrestRheaNow
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 27, 2020
ती म्हणाली, 'ड्रग्जचं सेवन करणाऱ्या मुलीच्या जाळ्यात माझा भाऊ कसा अडकला कोणास ठाऊक. कोणाच्या इच्छेविरोधात त्याला ड्रग्ज घ्यायला भाग पाडणं आणि नंतर तो व्यक्ती मानसिक रोगी आहे असं भासवणं.' अशा आशयाचे ट्विट सुशांतच्या बहिणीने केले आहेत.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा ऍन्गल समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचीही यात एन्ट्री झाली आहे. एनसीबीनेही याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतसिंह प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत.