सुष्मिता मुलींसोबत ठेका धरते तेव्हा...

मुलींसोबत सुष्मिताच्या घायाळ अदा  

Updated: Jan 2, 2020, 07:40 PM IST
सुष्मिता मुलींसोबत ठेका धरते तेव्हा... title=

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या बॉलिवूडपासून दूर गेलेली असली तरीही सोशल मीडियामध्ये मात्र ती चांगलीच सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यातीय प्रत्येक घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. नुकताच सुष्मिताने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलींसोबत थिरकताना दिसत आहे. 

नवीन वर्षाच्या सुरूवातीला तिने पोस्ट केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना आकर्षित करत आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'असं नृत्य करा की तुम्हाला कोणी पाहत नाही.' असे लिहिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s never easy to stay consistent, to stay motivated when it comes to any discipline in life!! So to get my kids to stay committed, I try to change it up, make it more fun...dance, explore, discover individual rhythm & all throughout they’re actually...willingly also doing cardio & yoga You all have often asked me, what keeps me going...well, this is the secret change it up & keep life interesting Come dance with us...life has a beautiful playlist for everyone..choose your tune & start moving...the rest will follow naturallyI love you guysduggadugga #2020 #exercisehappiness #dance #laugh #own

 

तिच्या आणि तिच्या मुलींच्या नृत्यअदा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सुष्मिताचा प्रियकर रॉमन शॉल देखील दिसत आहे.  मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय असणारा रॉमन आणि सुष्मिता एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची कबुलीही फार आधीच दिली आहे. 

पण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रोमनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या स्टेटसवरुन असे अंदाज वर्तवले जात आहेत. रोमनने रिलेशनशिप, नात्यांविषयी काही सूचक वाक्य लिहिली होती.  

तुम्ही फक्त रिलेशनशिपमध्य़े आहात म्हणून साथीदाराने तुम्हाला चांगली वागणूक द्यावी अशीच तुमची अपेक्षा आहे? तरीही जे व्यक्ती तुम्हाला चांगली वागणूक देत नाहीत आणि तुम्ही तरीही त्यांच्यासोबत आहात तर हा तुमचा दोष आहे! असं लिहित 'स्वत:वर प्रेम करा...', हा सूचक संदेश त्याने या पोस्टमधून दिला होता.