48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या

Sushmita Sen Marriage Plan : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 6, 2024, 10:46 AM IST
48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen Marriage Plan : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सुष्मिताचं नाव ललित मोदी आणि रोहमन शॉल यांच्यासोबत जोडण्यात आलं. आता वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता सेननं तिच्या लग्नाविषयी सांगितलं आहे की तिचा वेडिंग प्लॅन काय आहे. त्यासोबतच सुष्मितानं लग्नानंतर तिच्या एक्ससोबत मैत्री ठेवण्यावर देखील वक्तव्य केलं आहे. सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचं खासगी आयुष्य हे एखाद्या पुस्तकासारखं आहे असं सांगितलं. 

सुष्मिता सेननं ही मुलाखत इंडल्जला दिली होती. यावेळी सुष्मिता "माझं आयुष्य हे एखाद्या पुस्तकासारखं राहिलं आहे. कारण मी त्याला खूप प्रामाणिकपणे आणि कोणालाही न घाबरता जगले आहे. पण, प्रतिष्ठा ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यातील एकाच गोष्टीमध्ये दिसत नाही. ही आहे की तुम्ही कोण आहात? त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेता, मग कोणी तुम्हाला दुखावले असेल, तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुमची चूक असेल, काही फरक पडत नाही."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुष्मिता सेननं लग्न करण्याच्या प्रश्न विचारला की ती आधीपासून यासाठी तयार होती का? सुष्मिता म्हणाली, "नाही, हे कधीच... कधीच नाही करणार अशी परिस्थिती नव्हती. बायलॉजिकल क्लॉक असो किंवा मग सोसायटीच्या टीका... लग्न करण्यासाठी ही काही कारणं नव्हती. जो पर्यंत माझा प्रश्न आहे, जर समोरची व्यक्ती योग्य आहे आणि मला जे अपेक्षीत आहे ते सगळं आहे, तर नक्कीच मी लग्न करेन."

हेही वाचा : 11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत

सुष्मिता सेन पुढे लग्नानंतर एक्ससोबत मैत्री ठेवण्यावर देखील बोलली "मी नक्कीच मैत्री ठेवेन, पण मला वाटतं की हे खूप कठीण असू शकतं. अनेक लोकनंतर त्यांच्या एक्ससोबत मैत्री ठेवतात, पण कुठे एक रेश ओढायची हे विसरून जातात. पण काही लोक फक्त मित्र देखील राहतात. कारण मी स्वत: पाहिलं आहे. मी नशिबवान आहे की माझ्या आयुष्यातही असंच आहे. "

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x