'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा'

Kangana Ranaut Supports Her Claim Saying Subhash Chandra Bose Was First PM of India: कंगनाला तिने केलेल्या विधानावरुन ट्रोल केलं जात असतानाच तिने एक स्क्रीन शॉट 'पुरावा' म्हणून शेअर केला आहे. तिने टीकाकारांना टोला लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 6, 2024, 09:35 AM IST
'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा' title=
कंगनाची नवी पोस्ट चर्चेत

Kangana Ranaut Supports Her Claim Saying Subhash Chandra Bose Was First PM of India: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला भारतीय जनता पार्टीने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सध्या कंगना निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत तिने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी केलेल्या एका व्यक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस हेच स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा उल्लेख कंगनाने केला. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र आपल्या या विधानावर आपण ठाम असल्याचं सांगतानाच कंगनाने आपल्या विधानाचं समर्थन करणारा एक स्क्रीन शॉटच पुरावा म्हणून पोस्ट केला आहे.

कंगाने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं आहे?

नेताजी सुभाष चंद्र बोस हेच स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान असल्याच्या आपल्या दाव्याचं समर्थन करणारा एक स्क्रीन शॉट कंगनाने आपल्या एक्स (पूर्वीच ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. "भारताच्या पहिल्या पंतप्रधानांसंदर्भात जे लोक मला अक्कल शिकवत आहेत त्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा. हे वाचा. हा स्क्रीन शॉट म्हणजे नव्याने शिकत असलेल्यांसाठीचं जनरल नॉलेज आहे. जे लोक मला शिक्षण घेण्याचा सल्ला देत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की मी इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केलं असून त्यात अभिनयही केला आहे. हा चित्रपट नेहरु कुटुंबाच्या अवतीभोवती कथानक असलेला असल्याने मला शिकवू नका," असा टोला कंगाने लगावला आहे. "मी तुमच्या आयक्यूपेक्षा अधिक पुढचं बोलत असेल तर तुम्हाला मला काही ठाऊ नाही असं वाटू शकतं. या साऱ्यात तुम्हीच स्वत:चं हसू करुन घेतलं आहे," असा टोला कंगनाने लगावला आहे. 

तिने शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये आहे तरी काय?

कंगनाने शेअर केलेला स्क्रीन शॉट हा एका वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरील लेखाचा आहे. ज्यामध्ये, "21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूरमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 'आझाद हिंद'ची (स्वतंत्र भारताची) घोषमा केली. सुभाष चंद्र बोस यांनी स्वत:ला पंतप्रधान, देशाचा प्रमुख आणि युद्ध मंत्री म्हणून जाहीर केलं होतं. ही घोषणा दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेली," असा उल्लेख आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट...

कंगनाच्या या पोस्टवर अनेकांनी तिला उद्या आम्ही स्वत:ला कोणत्याही पदव्या देऊ असं चालेला का? असा प्रश्न विचारला असून तिने मांडलेला तर्क न पटणारा असल्याचं म्हटलं आहे. सध्या कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.