close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऐश्वर्यासोबतच्या वादाविषयी अखेर सुष्मिताचा महत्त्वाचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्रींमधील कॅटफाईट हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो.

Updated: Jun 4, 2019, 11:18 AM IST
ऐश्वर्यासोबतच्या वादाविषयी अखेर सुष्मिताचा महत्त्वाचा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींमधील कॅटफाईट हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. १९९४ साली अभिनेत्री सुष्मिता सेने हिने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला होता. तर दुसरीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मिस वर्ल्ड किताबावर आपले नाव कोरले होते. तेव्हा पासूनच या दोघींमधील शीत युद्धाच्या चर्चां चांगल्याच रंगत आहेत. बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्रींच्या वादाचे मुख्य कारण म्हणजे, ऐश्वर्या फॅशन आणि मॉडेलिंगच्या विश्वात सुष्मितापेक्षा एक पाऊल पुढे होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुष्मिताने त्यांच्यात असलेल्या कॉन्ट्रोव्हर्सिविषयी खुलासा केला आहे.

सुष्मिताने  ऐश्वर्यासोबत असलेल्या वादाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. सुष्मिता म्हणाली की, 'आम्हा दोघींमध्ये कोणत्याही प्रकारचे युद्ध नाही. दोघींबद्दल रंगणाऱ्या चर्चा केवळ अफवा आहेत.' त्यानंतर, सुष्मिता आणि ऐश्वर्या चांगल्या मैत्रीणी आहेत का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नावर प्रतिक्रिया देत ती म्हणाली, 'मैत्रीची सुरुवात भेटी-गाटींच्या माध्यमातून होते. आम्हाला सर्वप्रथम एकमेकींसोबत वेळ व्यतीत करावा लागेल. पण, आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत' 
 
मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही खुलासा केला. सुष्मिताने आपल्या मोठ्या मुलीला तू दत्तक असल्याचे फार भावूक पद्धतीने सांगितल्याचंही स्पष्ट केलं. ती म्हणाली 'मी रेनेला ही गोष्ट खेळत असताना सांगितली. बायोलॉजिकल आणि दत्तक असं सांगत, बायोलॉजिकल म्हणजे बोरींग आणि दत्तक म्हणजे मनापासून स्वीकारलेलं नातं.' मी तुला जन्म दिला नसला, तरी तुला मनापासून स्वीकारले आहे, असे तिने रेनेला सांगितले होते. 

सिनेस्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या आयुष्यातील घडामोडींची माहिती इतरांना देत असतात. सुष्मितासुद्धा सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. मग ती दुर्गापूजा असो किंवा प्रयिकरासोबतचे काही खासक्षन असो. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चाहत्यांसोबतचे नाते आणखी दृढ केले आहे हे खरे.