'ये है मोहब्‍बतें' फेम अनिता हिचा ब्राईडल लूक सोशल मीडियावर ट्रेंडींग...

टी.व्ही. वरील ये है मोहब्बते या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी सध्या लंडनमध्ये शूट करत आहेत.

Updated: Mar 29, 2018, 12:57 PM IST
'ये है मोहब्‍बतें' फेम अनिता हिचा ब्राईडल लूक सोशल मीडियावर ट्रेंडींग...

मुंबई : टी.व्ही. वरील ये है मोहब्बते या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी सध्या लंडनमध्ये शूट करत आहेत. अनिता आणि पूर्ण टीम शोच्या खास सिक्वेंससाठी लंडन येथे शूट करत आहेत. अनिताने अलिकडेच रनवे ब्राईडच्या लूकमध्ये फोटोशूट केले आणि तिचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनिताने इंस्‍टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटोज शेअर केले.

अनिता म्हणते

या फोटोशूटमध्ये अनिता मरून-गोल्डन रंगाच्या ब्राइडल लेहेग्यात अत्यंत सुंदर दिसत आहेत.त्यावर तिने सुंदर आणि साजेशी ज्वेलरी ही घातली आहे. पण ब्रायडल फुटवेअर ऐवजी त्यावर स्पोर्ट शूज घातले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, तिला स्नीकर लूक खूप आवडतो.पुढे ती म्हणते, काश ! माझ्या लग्नात असा ड्रेस कोड असता.

चाहत्यांसोबतचे फोटोज शेअर

सोशल मीडियावर अनिता खूप अॅक्टिव्ह आहे. अनिता हसनंदानीने लंडनमध्ये शूटदरम्यानचे चाहत्यांसोबतचे अनेक फोटोज शेअर केले आहेत.