Prakash Ambedkar : आगामी विधानसभा निवडणुसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु आहे.. तर छोट्या पक्षांनीही आघाड्यांच्या माध्यमातून कंबर कसलीये.. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'एकला चलो रे' ची हाक दिलीये..
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या रामदास आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात तिस-यांदा मंत्रिपदाची संधी मिळालीये.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवलेंनी आता आंबेडकरांना महायुती येण्याचं आवाहन करत मंत्रिपदाची ऑफर दिलीये..
प्रकाश आंबेडकर एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही, तर आंबेडकरांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे, असंही आठवलेंनी म्हटलंय..
1990 मध्ये प्रकाश आंबेडकर सोबत राहिले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं, असा गौप्यस्फोटही रामदास आठवले यांनी केलाय.मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ चित्र दिसू शकतं, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय..निवडणुकीचे पडघम सुरू झालेत, त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिलीये. त्यामुळे आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात, की आठवलेंच्या ऑफरकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे..
सांगलीतील खानापूर आटपाडी मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून संग्राम मानेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय... संग्राम मानेंनी प्रकाश आंबेडकरांकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.... दरम्यान संग्राम मानेंची उमेदवारी जाहीर झाल्यानं महायुती आणि मविआची डोकेदुखी ठरणार आहे...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केलीय.. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय.. यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलंय.. रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांनी उमेदवारी देण्यात आलीय.. तर ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय....
रावेर - शमिभा पाटील
सिंधखेड राजा - सविता मुंडे
वाशिम - मेघा डोंगरे
धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण-पश्चिम - विनय भांगे
साकोली - डॉ. आविनाश नान्हे
नांदेड दक्षिण - फारुख अहमद
लोहा - शिवा नरांगळे
संभाजीनगर पूर्व - विकास दांडगे
शेवगाव - किसन चव्हाण
खानापूर - संग्राम माने
ENG
(22.4 ov) 87/4 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
BRN
7/1(1.1 ov)
|
VS |
TAN
|
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.