दयाबेनची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्रीला ओळखणं ही कठिण

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Nov 8, 2021, 09:07 PM IST
दयाबेनची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्रीला ओळखणं ही कठिण title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोची एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक कलाकार महत्त्वाचा आणि मनोरंजन करत असतो. शोमधून कोणीही निघून गेल्याने ते अपूर्ण राहतं. या  शोची मुख्य अभिनेत्री दिशा वाकानी बऱ्याच काळापासून यात दिसलेली नाही.

शोमध्ये फँन्स दिशाला मिस करतात
शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशाला लोकं अजूनही मिस करतात. तर दुसरीकडे, तिची कमतरता पूर्ण करणारी कोणतीही अभिनेत्री आतापर्यंत सापडलेली नाही. अशा परिस्थितीत ती कुठे आहे आणि आजकाल काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी दिशाचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

दिशाचा फोटो व्हायरल झाला होता
दिशा आपल्या मुलीचं संगोपन करण्यासाठी शोपासून दुरावली होती आणि सध्या ती आपल्या मुलीला आणि कुटुंबाला वेळ देत आहे. दरम्यान, आता दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो तिच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री ओळखणं कठीण
या  फोटोतील दिशाला पाहता तिला ओळखणं तुम्हाला कठीण जाईल. या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये लहान मुलगी तिच्या खांद्यावर झोपलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर खूप थकवाही स्पष्ट दिसतोय. पण तिच्या स्माईलमध्ये भूतकाळातील गोडवा अजूनही आहे. दिशाकडे पाहता तिचं वजन  थोडं वाढलं आहे असं दिसतंय. आता अभिनेत्रीच्या या फोटोमुळे दिशाला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. मात्र, ती कधी परतणार, हे सध्याच सांगता येणार नाही