'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील प्रसिद्ध अभिनेत्री शो सोडल्यावर या कामात व्यस्त

तारक मेहता का उल्टा गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Sep 16, 2021, 04:38 PM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील प्रसिद्ध अभिनेत्री शो सोडल्यावर या कामात व्यस्त

मुंबई : तारक मेहता का उल्टा गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कोणताही अभिनेता जो या शोमध्ये एकदा सामील होतो तो कायमचा लोकप्रिय होतो. असंच काहीसं दिशा वाकाणी आणि निधी भानुशाली यांच्या बाबतीत घडलं. पण शोचं आणखी एक पात्र आहे जे खूप प्रसिद्ध होतं आणि त्यांनी शोला अलविदा म्हटलं आहे. आम्ही बोलतोय नेहा मेहता यांच्याबद्दल म्हणजेच अंजली तारक मेहता बद्दल. चला तर मग जाणून घेऊया नेहा सध्या काय करतेय.

गेल्या वर्षी नेहाला तिच्या काही समस्या शोच्या निर्मात्यांसोबत शेअर करायच्या होत्या. पण अनेक प्रयत्न करूनही तिला प्रतिसाद मिळाला नाही. या सगळ्यामुळे तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने पुन्हा शोमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली पण या सगळ्याला खूप उशीर झाला होता. कारण ही भूमिका सुनैना फोजदार निभावत होती. आता तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यानंतर नेहा मेहता शोबीजमधून पूर्णपणे गायब आहे. तिने इतर कोणतेही शो साईन केले नाहीत आणि ती अजकल काय करते हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे.

नेहाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट बघितल्यावर कळतं की, ती अलीकडेच एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. हे गाणं एक आध्यात्मिक गाणं आहे. आणि अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. तिने लिहिलं की, 'आमच्याकडे तुमच्यासाठी काही रोमांचक बातम्या आहेत! 

@Theishqindiaco  चा पहिला म्युझिक व्हिडिओ, नवकार मंत्र टीझर, नेहा मेहता अभिनीत, नीती मोहनने गायलेलं, चिरंतन बी संगीतबद्ध आणि परिण मेहता निर्मित, उद्या रिलीज होत आहे! अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सचं अनुसरण करा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तसंच, नेहा मेहता काही दिवसांपूर्वी तिच्या घरी गणेश उत्सवात व्यस्त होती. 'मला असं कुटुंब लाभलं आहे जे सार्वत्रिक शक्तीशी जोडलेलं आहे.' तसं, नवीन अंजली शोमध्ये परतली आहे. पण चाहते अजूनही तारक मेहतासोबतची तिची केमिस्ट्री खूप मिस करतायेत.