Munmun Dutta Raj Anadkat Engagement News : छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमांमधील सर्वाधिक चर्चेतील कार्यक्रम म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ओळखले जाते. या कार्यक्रमातील अनेक कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. हे कलाकार सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. आता अशाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत टप्पू हे पात्र साकारणारा अभिनेता राज अनाडकट आणि बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण आता यावर मुनमुन आणि राज यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील टप्पू आणि बबिता हे दोन्हीही पात्र लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या मालिकेत टप्पूचे पात्र साकारणारा राज अनाडकटने बबिता फेम मुनमुन दत्तासोबत गुपचुप साखरपुडा केल्याची बातमी न्यूज 18 या वृत्तवाहिनीकडून देण्यात आली होती. या दोघांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचे बोललं जात होतं. पण या सर्व बातम्या अफवा असल्याचं राज अनाडकटने सांगितले आहे. याबद्दल त्याने एक निवेदनही जारी केले आहे.
आणखी वाचा : 'जेठालालने घरात साप पाळला होता', 'बबिता' आणि 'टप्पू'च्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
राज अनाडकटने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने मुनमुन दत्तासोबत गुपचुप साखरपुडा उरकल्याच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे. “सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी ही पूर्णपणे खोटी आणि अर्थहीन आहे. त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेऊ नका, असे राज अनाडकटने सांगितले आहे. तर मुनमुनदेखील यावर एक निवेदन दिले आहे. एकदम वाईट आणि हास्यास्पद! या व्हायरल बातमीत काहीच तथ्य नाही. मी अशा खोट्या बातम्यांवर माझा वेळ आणि शक्ती वाया घालवणार नाही, असे मुनमुन दत्ताने म्हटले आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी बबिता आणि टप्पू हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देत या चर्चा असल्याचे सांगितले होते. मुनमुन दत्ता ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेद्वारे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत 2008 पासून ती बबिता हे पात्र साकारत आहे. तिची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. तर राज सध्या 27 वर्षांचा आहे. 2007 मध्ये अभिनेता भव्य गांधीने टप्पू ही भूमिका सोडल्यानंतर त्याच्या जागी राज अनाडकटची वर्णी लागली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याने या कार्यक्रमाला रामराम केला होता.