IVF साठी माझं स्पर्म वापरा सगळा खर्च मी करतो; 'या' उद्योजकाची महिलांना खुली ऑफर

IVF : मागील काही वर्षांमध्ये वंध्यत्वावर मात करण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. आयवीएफ ही प्रक्रियासुद्धा त्याचाच एक भाग.   

सायली पाटील | Updated: Nov 13, 2024, 01:53 PM IST
IVF साठी माझं स्पर्म वापरा सगळा खर्च मी करतो; 'या' उद्योजकाची महिलांना खुली ऑफर title=
Viral news Telegram CEO offers free IVF to women interested using his sperm

IVF : बदलती जीवनशैली, सततचा ताण, नैराश्य, शारीरिक अडचणी या आणि अशा कैक कारणांमुळं गेल्या काही वर्षांमध्ये महिला आणि पुरुषंच्या प्रजननक्षमतेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. नैसर्गिकरित्या गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणींवर तोडगा म्हणून बदलच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं हल्ली अगदी सर्रासपणे आयवीएफ किंवा तत्सम तंत्रांचा वापरही केला जात आहे. पण, या सर्व प्रक्रिया खर्चिक आहेत ही बाब नाकारता येत नाही. 

उद्योजक देतोय मोफत आयवीएफची ऑफर... 

जाणून आश्चर्य वाटेल, पण एक असा उद्योगपती आहे जो सध्या महिलांना आयवीएफ प्रक्रिया अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. अट फक्त एकच, या प्रक्रियेमध्ये त्या उद्योजकाच्याच शुक्राणूंचा वापर करायचा. 

टेलिग्रामचा सीईओ आणि रशियन अब्जाधीश Pavel Durov नं महिलांना IVF प्रक्रियेसाठी आपले शुक्राणू मोफत देण्याची घोषणा केली आहे. ज्या महिलांना आयवीएफच्या माध्यमातून गर्भधारणा करायची आहे त्यांना तो स्पर्म मोफत उपलब्ध करून देत आहे. अल्ट्राविटा फर्टिलिटी क्लिनिकच्या साथीनं पावेलनं या उपक्रमात सहभाग घेतला असून, या क्लिनिकच्या अधिकृत संकेतस्थळावरही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पावेलच्या शुक्राणूंना स्टोअर करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी अल्ट्राविटानं विशेष अधिकार घेतले आहेत. 

हेसुद्धा वाचा : श्वास घ्यायचा आवाजही मृत्यू ओढावतो; चिटपाखरू नसणाऱ्या शहरात नेमकं काय घडतं? 'हा' भयपट पाहताना धडकीच भरेल

पावेलनं जाहीरपणे शुक्राणू देण्यासंबंधीची चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यानं जवळपास 12 देशांमध्ये आपली 100 हून अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याचा गौप्यस्फोट केला होता. 2024 मध्येच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यानं याविषयीचा दावा केला होता, जिथं त्यानं आपण 15 वर्षापूर्वीपासून स्पर्म डोनेट करण्याचं काम सुरू केल्याचं सांगितलं होतं. सध्या याच पावेलच्या नव्या उपक्रमामुळं संपूर्ण जगभरात त्याची चर्चा सुरू आहे.