मुंबई : लोकप्रिय टीव्ही सिरियल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Oolta Chashmah) ने नुकतेच १२ वर्ष पूर्ण केले आहेत, ज्यात शोमधील सर्व कलाकार आनंदी असल्याचं दिसून येत आहे. 'तारक मेहता', ही मालिका मागील १२ वर्षात प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करणारी मालिका ठरली आहे. एवढ्या वर्षानंतर प्रेक्षकांकडून या कलाकारांना भरभरून प्रेम मिळतंय.
दयाबेन असू द्या, नाहीतर भिडे, सर्व पात्रांना प्रेक्षक मनापासून पसंद करतात, एवढ्या वर्षानंतरही यातील चार्म लोकांमध्ये आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे भाग पुन्हा पुन्हा पाहणे देखील प्रेक्षक पसंत करतात.
आपली सहकारी वेबसाईट Bollywoodlife कडून एक मोठी बातमी येत आहे. यातील 'रोशन सिंह सोढी,' नावाचं लोकप्रिय पात्राची पार पाडणारे गुरूचरन यांनी या मालिकेला बाय बाय म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊननंतर गुरूचरन हे शुटिंगला येत नाहीत. पण या मालिकेच्या निर्मात्यांना म्हटलंय की गुरूचरन अजूनही मालिकेचा भाग आहेत.
मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टसनुसार अजूनही गुरूचरन यांच्या बदल्यात नव्या कलाकाराचा शोध सुरू आहे. तसेच शाहरूख खानसोबत 'दिल तो पागल है', या सिनेमात भूमिका साकारणारे, बलविंदर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकतो.
याआधी देखील गुरूचरन यांनी २०१३ साली हा शो सोडला होता. तेव्हा बातम्या आल्या होत्या की, निर्मात्यासोबत त्यांचे मतभेद होते. त्यानंतर पुन्हा एका वर्षानंतर ते परत 'तारक मेहता'मध्ये परतले होते.