TMKOC VIRAL VIDEO: जेठालालचा माथेफिरुपणा, घर आणि दुकानाची का लावतोय वाट?

सकाळी उठल्यानंतर या बाबाने दिलेल्या तांब्याच्या पत्राचा परिणाम जेठालालवर झालेला असतो. जेठालाल अगदी विचित्र वागायला लागतो. ते पाहून सगळेच चकीत होतात.

Updated: Jul 16, 2021, 10:13 PM IST
TMKOC VIRAL VIDEO: जेठालालचा माथेफिरुपणा, घर आणि दुकानाची का लावतोय वाट? title=

मुंबई : स्मॉल स्क्रीनवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. मालिकेत जेठालालवर येणारे प्रसंग आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याची सुरु असणारी धडपड प्रेक्षक चांगलेच एन्जॉय करतात.

त्यात आता मालिकेतील एक सीन व्हायरल होत आहे. ज्यात जेठालालवर एका बाबाने जादूटोणा केला आहे. त्यानंतर उडालेला गोंधळ या व्हिडिओत पाहायला मिळतो आहे. 

जेठालालचे बदललेला रुप

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका भागात जेठालाल घरी परत येत असताना त्यांच्यावर एका बाबाने जादूटोणा केला आहे. त्याला तांब्याचा पत्रा त्याच्या हातात देऊन त्याला घरी पाठवलं आहे. घरी पोहोचल्यावर जेठालाल तो पत्रा दयाच्या हातात देतो. त्यानंतर दया तो पत्रा जेठालालच्या उशी खाली ठेवते.सकाळी उठल्यानंतर या बाबाने दिलेल्या तांब्याच्या पत्राचा परिणाम जेठालालवर झालेला असतो. जेठालाल अगदी विचित्र वागायला लागतो. ते पाहून सगळेच चकीत होतात.

जेठालाल दुकानाची लावतो वाट 

जेठालाल दुकानात पोहोचतो आणि दुकानाचं नुकसान करतो, तो ग्राहकांना सामान अगदी कमी किंमतीत विकायला सुरुवात करतो. ते पाहून नट्टू काका हा प्रकार चंम्पक चाचांना सांगतात. चंम्पक चाचा जेठालालला घरी बोलावून घेतात. जेठालालच्या विचित्र वागण्याचा फायदा सोसायटीतील लहान मुलं देखील घेतात. जेठालालची ही अवस्था पाहून भिडेला एक आयडीया सुचते. 

भिडेने घेतला फायदा

भिडे जेठालालच्या अशा वागण्याचा फायदा घेत त्याला गोकुल धाममधील घर विकण्यास सांगतो. जेठालाल लगेचच होकार देतो. 25 लाखात घर विकण्यासाठी जेठालाल तयार होतो, तेवढ्यात बाबूजी, दया आणि टप्पू घरी येतात. घर घेण्यासाठी आलेल्या लोकांना बाबूजी पळवून लावतात. जेठालाल घर विकतोय हे ऐकून तारक मेहता जेठालालच्या घरी पळत येतो. त्यानंतर दया घडलेला प्रकार सांगते. मग तारक मेहता बाबाने दिलेला तांब्याचा पत्रा बाहेर फेकून देतो. त्यानंतर काही वेळात जेठालाल नॉर्मल होतो.