Taarak Mehtaला मिळाली 'नवीन Daya Bhabhi', तर जेठालालच्या भूमीकेत दिसला हा अभिनेता

खूप दिवसांपासून दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकाणी या शोमध्ये दिसली नाही.

Updated: Sep 14, 2021, 07:59 PM IST
Taarak Mehtaला मिळाली 'नवीन Daya Bhabhi', तर जेठालालच्या भूमीकेत दिसला हा अभिनेता

मुंबई : प्रत्येक घराघरात पोहोचलेला शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये अनेक स्टारकास्ट आहत, आणि प्रत्येकाचा आपला एक चाहता वर्ग आहे, पण जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि दया बेन म्हणजेच दिशा वाकाणी यांचा सर्वाधिक चाहता वर्ग आहे आणि त्यांना प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे.

परंतु खूप दिवसांपासून दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकाणी या शोमध्ये दिसली नाही, ज्यामुळे तिचे चाहती तिच्या येण्याची वाट पाहत आहेत. दिशाने हा शो सोडल्यानंतर शोच्या फॅन फॉलोइंगवर देखील खूप परिणाम झाला. 

अजून तरी शोमध्ये दया बेनच्या भूमीकेला कोणीही रिप्लेस केलेलं नाही. त्यामुळे अजूनही काही लोक दिशा वकाणीची शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत.

परंतु जर तुम्हाला असे सांगितले की, एक नवीन दया भाभी सापडली आहे, तर तुमची यावर काय रिअ‍ॅक्शन असेल? कदाचित तुम्हाला याचा धक्का बसेल किंवा काही लोकं उत्सुक असतील की, ही नवीन दया बेन कोण असेल? नवीन दया बेन तिच्या अ‍ॅक्टींगने दया भाभीच्या भूमीकेला न्याय देईल का?

ऐश्वर्या शर्मा टीव्ही सीरियल 'गम है किस के प्यार में' मध्ये पाखीची भूमिका साकारत आहे आणि ती दया भाभीच्या भूमिकेत दिसत आहे. खरेतर तिने दया भाभी आणि जेठालाल यांच्या ऑडिओला सिंक करुन एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व्यतिरिक्त, नील भट्ट जेठालालच्या भूमिकेत दिसत आहे. परंतु हा फक्त एक इस्टाग्राम रील्स आहे. शोमध्या अजूनही नव्या दया भाभीची एन्ट्री झालेली नाही.

नील भट्ट झाला जेठालाल
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील ऑडिओ सिंक करुन एक छोटा सीन केला आहे. त्यामुळे जोडप्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून पसंती दर्शवली जात आहे.

हा व्हिडीओ पाहिल्याानंतर अनेक लोकांनी कमेंट्समध्ये सांगितले की, 'ऐश्वर्याने दया भाभीची भूमिका साकारली पाहिजे.' तर एका चाहत्याने लिहिले, 'निर्मात्यांची नजर अजून या व्हिडीवर पडलेली नाही. अन्यथा दोघांच्या अभिनयाने त्यांना एकदा विचार करायला भाग पाडले असते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गरिमा गोयलही 'दया भाभी'

दया भाभीच्या भूमिकेबाबत अनेक अभिनेत्रींची नावे अनेकवेळा समोर आली असली तरी आतापर्यंत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये नवीन दया भाभीची एन्ट्री झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आणि YouTuber गरिमा गोयल दिशा वाकाणीच्या प्रसिद्ध भूमिकेत दया भाभीच्या लूकमध्ये दिसली होती. गरिमा पूर्णपणे दया बेनच्या गेटअपमध्ये होती. साडी घालण्याच्या स्टाईलपासून ते केस-मेकअपपर्यंत ती अगदी दया भाभीच दिसत होती.

दिशा वाकाणीच्या एनर्जीला तोड नाही

दिशा वाकाणीच्या एनर्जीला मॅच करणे आणि दया बेनच्या भूमीकेला मॅच करणे इतके सोपं नाही. त्यामुळेच कदाचित शोसाठी नवीन दया बेन शोधण्यात शोच्या मेकर्सना बाधा येत असावी.