अनंत अंबानींच्या लग्नात तैमुरची नॅनी, काय आहे अंबानी कुटुंबियांशी खास कनेक्शन

Anant Ambani Nanny : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला तैमुरच्या नॅनीची उपस्थिती चर्चेचा विषय होता. या मागचं कारण काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 17, 2024, 07:59 PM IST
अनंत अंबानींच्या लग्नात तैमुरची नॅनी, काय आहे अंबानी कुटुंबियांशी खास कनेक्शन

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नाचे सर्व शाही सोहळे अतिशय भव्य पद्धतीने पार पडले. लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शनही दोन दिवस चालले. एवढंच नव्हे तर अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. 

अनंत अंबानींच्या दुसऱ्या रिसेप्शनमध्ये नववधू राधिका मर्चंटला भेटण्यासाठी खास पाहुणे आले होते. यामध्ये एका व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. ती व्यक्ती म्हणजे चक्क तैमुरची नॅनी आहे.

तैमुरच्या नॅनीला अनंत अंबानीच्या लग्नामध्ये पाहून नेटीझन्स चक्रावले. तैमुरच्या नॅनी आणि अनंत अंबानी यांच काय कनेक्शन आहे, अशी देखील चर्चा रंगली. 

तैमुरच्या नॅनी ललिता डिसिल्वा तैमूरच्या आधी अनंत अंबानीची नॅनी होती आणि बालपणात त्याची पूर्ण काळजी घेत होती. केवळ ललिता आणि अनंतच नाही तर संपूर्ण अंबानी कुटुंब खूप जवळचे आहे आणि त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. यामधून त्यांचं बाँडिंग देखील स्पष्ट होतं. 

बालपणीच्या नॅनीला विसरले नाही 

नॅनी ललिता डिसिल्वाने अनंत अंबानींचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती त्यांचा हात धरून परदेशात फिरत आहे. ललिता डिसिल्वाने या पोस्टच्या माध्यमातून अनंतसोबतचे तिचे बॉन्डिंग आणि नाते कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ' मी आणि अनंत अंबानी पॅरिस डिस्ने वर्ल्डमध्ये आहोत. इथूनच मी माझी बेबी केअरची नोकरी सुरू केली. अनंत लहानपणी खूप चांगला मुलगा होता. आत्तापर्यंत तो कौटुंबिक आणि सामाजिक बाबतीत सर्वांचा लाडका आहे. आज त्याचा मोठा दिवस आहे. तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मी तिला शुभेच्छा देतो. देव या जोडप्याला आशीर्वाद देवो.

अंबानी कुटुंबाशी खास कनेक्शन 

यानंतरच त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अनेक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अनंत अंबानींसोबत ललिता डिसिल्वा संपूर्ण अंबानी कुटुंब आणि नवीन सून राधिका मर्चंटसोबत दिसत आहे. याफोटोंसोबत  कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अनंत बाबा आणि अंबानी कुटुंबाने माझ्या आयुष्यात आणलेल्या आनंद आणि प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. या खास क्षणांसाठी मी कृतज्ञ आहे. तसेच त्यांच्या अतूट प्रेम आणि आदराबद्दल मी कृतज्ञ आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा दयाळूपणा आणि औदार्य मला प्रेरणा देत आहे. माझ्या आयुष्यात नीता भाभी आणि मुकेश सर आहेत यामुळे ती धन्य झाली आहे. ते अजूनही मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात. अनंत आणि राधिका यांना उदंड प्रेम, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. अंबानी कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या जीवनाचा एक भाग असल्याचा मला सन्मान वाटतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x