तमन्ना भाटिया सोडवणार 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येचं कोडं? अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Tamannaah Bhatia Aakhri Sach : 'जेलर' या चित्रपटानंतर तमन्ना भाटियाच्या 'आखरी सच' या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 11, 2023, 06:43 PM IST
तमन्ना भाटिया सोडवणार 11 जणांच्या सामूहिक आत्महत्येचं कोडं? अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज title=
(Photo Credit : Social Media)

Tamannaah Bhatia Aakhri Sach : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण तिची आगामी सीरिज 'आखिरी सच' आहे. या सीरिजमध्ये तमन्नाचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. ही एक क्राइम थ्रिलर स्टोरी असणार आहे. ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आखरी सचचे दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल याविषयी म्हणाले, 'आखरी सचची कथा ही संवेदनशील आहे आणि ही सीरिज सादर करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. पोलिसांच्या दृष्टिकोनातून एका कठीण प्रकरणाची कथा सांगण्यासाठी ही मालिका बनवली आहे. 'आखरी सच' ही काल्पनिक पात्रांसह सत्य घटनेवर आधारीत कथा आहे, ज्याने देशाला हादरवून सोडले आहे. अन्या नावाची ही पोलीस या प्रकरणाचा तपास करते. अन्या ही व्यक्तिरेखा तमन्ना भाटिया हिने साकारली असून या व्यक्तिरेखेसाठी तिने बरीच तयारी केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तमन्नाच्या या सीरिजमध्ये तमन्ना ही अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारण्याची तयारी करत आहे. तमन्ना या सीरिजविषयी बोलताना म्हणाली की 'जेव्हा आखरी सच माझ्याकडे आली तेव्हा ही एक कथा होती, ज्याने माझं मन जिंकून घेतलं. हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. पहिले कारण, मी पहिल्यांदाच एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका एका वेगळ्या फॉरमॅटमध्ये साकारत आहे. या कथेचा एक भाग बनून मला डिस्ने+ हॉटस्टार सोबत जगासमोर नेण्यात आनंद होत आहे.'

हेही वाचा : दुसऱ्यांदा होणार होती आई, पण 5 व्या महिन्यात झाला गर्भपात; राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा

आखरी सच फक्त Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. फिल्म्स निर्मित आणि रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित आहे. या सीरिजचे लेखन सौरव डे यांनी लिहिली आहे. अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग, दानिश इक्बाल, निशू दीक्षित, क्रिती विज आणि संजीव चोप्रा यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. आखरी सच, जेलर आणि भोला शंकर व्यतिरिक्त तमन्नाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मल्याळममध्ये बांद्रा, तमिळमध्ये अरनामनाई 4 आणि जॉन अब्राहमसोबत तिच्याकडे एक हिंदी चित्रपट देखील आहे. या चित्रपटाचं नाव वेदा असे आहे. ही सीरिज 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.