फॅनच्या 'त्या' कृत्याने Tamannaah Bhatia ढसाढसा रडली, Video सोशल मीडियावर Viral

Tamannaah Bhatia Video : तमन्ना भाटिया सध्या लस्ट स्टोरीज 2 या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्या ती ढसाढसा रडताना दिसत आहे. 

Updated: Jun 27, 2023, 02:21 PM IST
 फॅनच्या 'त्या' कृत्याने Tamannaah Bhatia ढसाढसा रडली, Video सोशल मीडियावर Viral  title=
Tamannaah fan with her face tattooed and touches her feet Tamannaah Bhatia get emotional video viral Lust Stories 2

Tamannaah Bhatia Video : गेल्या काही दिवसांपासून तामिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील यशस्वी अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. टॉलिवूडनंतर तिच्या बॉलिवूडमध्येही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेता विजय वर्मा आणि तमन्नाने आपणं प्रेमात असल्याची कबुली दिल्यावर चाहत्यांनी त्यांचावर शुभेच्छाचा वर्षाव केला. 

लस्ट स्टोरीज 2 या वेबसीरीजमधून ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  नेटफ्लिक्स या सीरीजमध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहिला मिळणार आहे. बोल्ड आणि रोमान्स करताना या दोघांनी मर्यादा ओलांडली आहे. तिच्या या वेबसीरीज चर्चा सुरु असतानाच तमन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. (Tamannaah fan with her face tattooed and touches her feet Tamannaah Bhatia get emotional video viral Lust Stories 2)

नेमकं काय घडलं?

हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. तमन्नाला विमानतळावर आली तेव्हा तिला भेटायला चाहते आले. त्यातील एका चाहती तिची जबरी फॅन निघाली. तिने हातावर तमन्नाचा टॅटू काढला होतो. या टॅटूच्या खाली तिने लव्ह यू तमन्ना असं लिहिलं देखील होतं. ती पहिले तमन्नाच्या पाया पडली आणि नंतर तमन्नाला टॅटू दाखवताच ती भावूक झाली. तिने त्या महिलेला मिठ्ठी मारली आणि तिचे डोळे पाणावले. 

चाहतीचं एवढं प्रेम पाहून तमन्ना गहिवरली. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर विरल भयानीने यांनी शेअर केला आहे.

नुकताच OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर आलेल्या 'जी करदा' या वेबसीरीजमुळे ती चर्चेत आहे. 

आता त्याच्या लस्ट स्टोरीज 2 या वेबसीरीजची चाहते वाट पाहत आहे. ही सीरीजत नेटफ्लिक्सवर गुरुवारी 29 जूनला रीलीज होणार आहे.

त्यानंतर तिचा चिरंजीवीसोबतचा भोला शंकर हा चित्रपट ऑगस्टमध्ये येणार आहे.