राजकारणात थैलावाची ग्रँड एन्ट्री...

नवीन वर्षात सुरू करणार स्वतःचा पक्ष

Updated: Dec 3, 2020, 03:39 PM IST
राजकारणात थैलावाची ग्रँड एन्ट्री...  title=

मुंबई : Superstar Rajinikanth रजनीकांत आता सिनेसृष्टीतून राजकारणात प्रवेश करत आहेत. रजनीकांत लवकरच राजकीय सिनेमात एन्ट्री घेणार असल्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी सगळ्या चर्चांना विराम दिला असून स्वतःच्या पक्षाची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी स्वतःच्या 'रजनीकांत राजकीय पक्ष' याची घोषणा केली आहे. 

थलैवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांनी आपल्या समर्थकांना नवीन पार्टीबाबत सांगितलं की, नवीन वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यातून पक्षात प्रवेश घेतला जाईल. मात्र पक्षाची घोषणा ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. 

रजनीकांत यांनी ट्विटरवर म्हटलंय की,'३१ डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा केली जाणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पक्ष लाँच होणार आहे. '

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली आहे. पुढच्या वर्षी ‘थलायवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. सोमवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या ‘रजनी मक्कल मंद्रम’ या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.