तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'

Tanushree Dutta on Nana Patekar : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तवक्य केलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Sep 21, 2023, 07:24 PM IST
तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'
(Photo Credit : Social Media)

Tanushree Dutta on Nana Patekar : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारी राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यात सुरु असलेला वाद टोकाला गेला आहे. एकीकडे त्यांचा वाद सुरु असताना अभिनेत्री तनुश्री दत्तानं या प्रकरणात उडी घेतली आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिल खानसोबत दिसली. यावेळी तनुश्री दत्तानं राखी सावंतवर अनेक आरोप केले. इतकंच नाही तर राखीमुळं दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा आरोप तनुश्रीने केला. यावेळी तनुश्रीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मीटूचा उल्लेख केला. मीटूबद्दल बोलताना तनुश्रीनं नाना पाटेकरांचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तनुश्रीला नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तनुश्रीनं मीटू मोहिमेत नाना पाटेकरांबरोबरच विवेक अग्निहोत्रींवरही आरोप केले होते. 'ज्या लोकांमुळे तुझं करिअर खराब झालं त्यांच्या चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड मिळत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात नाना पाटेकरही आहेत.' असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नावर उत्तर देत तनुश्री म्हणाली की 'नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी आपण का बोलत आहोत? त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते. 2008 मध्ये नाना पाटेकरांचं माझ्याबरोबर भांडण झालं होतं, तेव्हादेखील त्यांचा चित्रपट चालला नव्हता. जेव्हा त्यांचे चित्रपट चालत नाहीत. तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येतात. जेणेकरुन, मी त्यांच्या चित्रपटात आयटम साँग करेन आणि त्यांचे चित्रपट चालतील.'

नाना पाटेकर असं का करतात याविषयी सांगत तनुश्री म्हणाली की 'मीडिया त्यांच्या चित्रपटांबाबत तनुश्रीला विचारेल आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही.' 

हेही वाचा : Jawan चा दिग्दर्शक ॲटलीवर नयनतारा नाराज, आता नाही करणार बॉलिवूड चित्रपट!

राखी सावंतच्या विरोधात उभं राहण्याविषयी तनुश्री म्हणाली की राजश्री तिची मैत्रिण आहे. कारण ती तिच्याकडे सलूनची सर्विस घ्यायला जात होती. आता जेव्हा आदिल खान दुर्रानी आणि राजश्रीला भेटला तेव्हा तिला हिंमत मिळाली आणि ती राखी सावंतच्या विरोधात समोर येऊन त्याविषयी बोलू शकेल. 

About the Author