'तारक मेहता' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे बॉल्ड फोटोशूट, दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ... पाहा फोटो

आता पुन्हा एकदा ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

Updated: Aug 14, 2022, 05:11 PM IST
'तारक मेहता' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे बॉल्ड फोटोशूट, दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ... पाहा फोटो title=

TMKOC actress bold photoshoot:  छोट्या पडद्यावरील सुपरहिट कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधल्या प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरली आहेत. या शोमध्ये बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता अनेकदा चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

मुनमुनला आज प्रत्येक घराघरात बबिता जी या नावाने ओळखली जाते. मुनमुनने आपल्या अभिनयानेच नव्हे तर आपल्या मनमोहक सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी ती नेहमीच आपले हटके आणि आकर्षक फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होतो आहे. 

इन्टाग्रामवर मुनमुनने गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत सोबत मुनमुनने मॅचिंग कानातले घातले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या लूकमध्ये मुनमुन एवढी बोल्ड दिसत आहे की चाहत्यांना तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. मुनमुनचा हा लूक सध्या त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. काही मिनिटांतच तिच्या या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.