अखेर शैलेश लोढांनी सोडलं मौन...'तारक मेहता..' सोडण्यावर बोलले 'फायरब्रिगेड'

'तारक मेहता...' मालिकेतील शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याच्या बातम्या सध्या सुरू आहेत. त्यावर स्वतः लोढा यांनी पोस्ट लिहिली आहे.

Updated: May 18, 2022, 02:43 PM IST
अखेर शैलेश लोढांनी सोडलं मौन...'तारक मेहता..' सोडण्यावर बोलले 'फायरब्रिगेड' title=

मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोचे चाहते सध्या खूप निराश झाले आहेत. शैलेश लोढा शो सोडल्याची बातमी समोर आल्यापासून लोक दु:खी झाले आहेत. 

तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांना धक्का बसला जेव्हा शैलेश लोढा हा शो सोडत असल्याची बातमी पसरली. शैलेश लोढा गेल्या 1 महिन्यापासून शूटिंग करत नसल्याचं समजतंय त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

या बातम्यांनंतर स्वतः शैलेश लोढा यांनी इन्स्टाग्रामवर एक गूढ पोस्ट लिहिली आहे. शैलेश लोढा यांनी एक साईड प्रोफाइलचा एक फोटो शेअर केला आहे. चित्रात शैलेश लोढा निराश दिसत आहेत. 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शैलेश लोढा यांनी लिहिले, हबीब सोज साहिबचा एक अप्रतिम शेर आहे. 'यहां मजबूत से मजबूत लोहा टूट जाता है. कई झूठे इकट्ठे हों, तो सच्चा टूट जाता है'

शैलेश लोढा यांच्या या पोस्टवर लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या. प्रेक्षकांनी लोढा यांना ही मालिका न सोडण्याची विनंती केली आहे. तारक मेहतामधील त्यांची व्यक्तिरेखा त्यांना खूप आवडत असल्याचं चाहत्यांनी सांगतात. शैलेश लोढा यांनी शो सोडल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया द्यावी, असेही युजर्सनी लिहिले आहे.

एक व्यक्ती लिहिते- प्रिय लोढा जी, नुकतीच बातमी मिळाली की तुम्ही तारक मेहता का उल्टा चष्मा सोडत आहात? का सर... तुमच्यासारखा कुशल कलाकार मी माझ्या हयातीत पाहिला नाही. तुम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करा. 

अनेकांनी रडणारे इमोजीही पोस्ट केले आहेत. सर्वांनीच लोढा यांना शोमध्ये राहण्याचं आवाहन केलंय. शैलेश लोढा आणि निर्मात्यांनी या प्रकरणी अद्याप कोणतंही वक्तव्य केलेले नाही. 

सर्व सस्पेंस आणि अफवांमुळे चाहते शैलेश लोढा यांच्या बातमीचं सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत