'या' अभिनेत्रीला आपले कपडेही सांभाळता येईना, शेवटी बॉयफ्रेंडने केली सेवा; पाहा VIDEO

ते हल्ली कुठेही स्पॉट झाले की त्यांची जोरदार चर्चा ही सुरू होते. 

Updated: Aug 1, 2022, 12:36 PM IST
'या' अभिनेत्रीला आपले कपडेही सांभाळता येईना, शेवटी बॉयफ्रेंडने केली सेवा; पाहा VIDEO title=

मुंबईः अभिनेत्री अनुष्का दांडेकर हिच्यासोबत दहा वर्ष डेट केल्यानंतर आता अभिनेता करण कुंद्रा हा टेलिव्हिजन हिरो अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आजकाल करिना आणि सैफ अली खानच्या जितक्या चर्चा होत नसतील तेवढ्या चर्चा ही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या जोडीची आहे. ते हल्ली कुठेही स्पॉट झाले की त्यांची जोरदार चर्चा ही सुरू होते. 

हल्ली त्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ हे चर्चेत असतात. त्या दोघांचीही कमेस्ट्री ही सगळ्यांना आवडते. आता पुन्हा एकदा करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. 

तेजस्वी आणि करण आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त लेट नाईट पार्टीसाठी गेले होते. तेव्हा ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले होते. रात्री उशिरा करण आणि तेजस्वी त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहचले त्यादरम्यान तेजस्वी प्रकाश अत्यंत बोल्ड लुकमध्ये पार्टीला आली होती. 

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे की तेजस्वीने रिव्हलिंग बॅकलेस टॉप घातला आहे. तिचा ब्रेलेस पार्टी लूक खूपच आकर्षक असला तरी तिच्या या बेकलेस टॉपमुळे तिची फारच गोची उडाली होती आणि अशाप्रसंगी खुद्द बॉयफ्रेंड करण कुंद्राच तिच्या मदतीला धावून आला होता. आपल्या पाठचा भाग लपवण्यासाठी तेजस्वी सारखी त्याच्या आड लपत होती तर तोही तिच्या मागून चालून तिला झाकण्याचा प्रयत्नही करत होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी सर्वांनाच आवडते आणि प्रत्येकजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे. करण आणि तेजस्वीच्या लग्नाबाबत सध्या कोणतेही अपडेट नसले तरी हे जोडपे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. करण आणि तेजस्वीची प्रेमकहाणी बिग बॉग हाऊसमध्ये सुरु झाली होती.