Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच

Motherhood : स्तनपानाविषयीचा एक वेगळाच दृष्टीकोन तिनं मांडला. आई होणं सोपं नसतं, इथं मुलासोबतच त्यांना जन्म देणाऱ्या महिलेचीही तितकीच काळजी घेतली जाणं महत्त्वाचं... पाहा काय म्हणतेय ही अभिनेत्री 

Updated: May 17, 2023, 12:58 PM IST
Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच  title=
television Actress and new mom Neha Marda on motherhood pregnancy breast feeding and diet

Post Pregnancy Diet and Breastfeeding : मातृत्त्वाचं सुख म्हणजे महिलेचा पुनर्जन्म. बाळ जन्माला घालण्याचा संपूर्ण काळ गर्भवती मातेच्या शरीरात बरेच बदल होत असतात. अशा बदलांना सामोरं जात बाळासाठी ही माता दिवसरात्र एक करते, त्याची काळजी घेते. हे सुख, ही अनुभूती सर्वांनाच मिळते असं नाही, तर काहींच्या आयुष्यात हा टप्पा बऱ्याच प्रतीक्षेनंतर येतो. मातृत्त्वाच्या या प्रवासामध्ये 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीच्याही जीवनात हे वळण लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर आलं. (television Actress and new mom Neha Marda on motherhood pregnancy breast feeding and diet )

आव्हानं तिथेच संपली नाहीत. कारण, गर्भवती असतानाच एकाएकी तिची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर नऊ महिन्यांच्या आधीच तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही अभिनेत्री म्हणजे नेहा मर्दा. नेहाचं बाळ या जगात आलं. पण, बाळाची प्रकृती पाहता जन्मानंतर नेहा लेकिला हातातही घेऊ शकत नव्हती. NICU मध्ये असल्यामुळं ती मुलीला फक्त पाहू शकत होती. पण, या दिवसांनाही तिनं धीरानं तोंड दिलं. 

आता सगळं लक्ष लेकिवरच... 

एका माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत नेहानं मुलीला स्तनपान करण्याचा अनुभवही सांगितला. वयाच्या 34 व्या वर्षी आई झाल्यामुळं या सर्व गोष्टींबाबत मैत्रीणींकडून ऐकलं होतं. स्तनपानाचा अनुभव बऱ्याचदा खूप संतुष्टी देणारा असतो, पण काही प्रसंगी तो थकवणाराही असतो असं ती म्हणाली. बाळ त्याच्या खाण्यासाठी तुमच्यावरच अवलंबून असतं आणि तुम्ही अनेकदा थकलेल्या असता... अशी वस्तुस्थिती तिनं स्वत:च्या अनुभवातून मांडली. 

गरोदरपणामध्ये मसूरची डाळ, डिंकाचे लाडू, मखाना, साबुदाण्याची खीर हे आणि असे अनेक पदार्थ मी खाल्ले,  असं सांगताना नेहानं इतरही मातांना स्तनपान करण्याचा सल्ला दिला. स्तनपान करण्यास नकार देऊ नका असं सांगताना तिनं याच काळात तुमच्या बाळाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते असंही सांगितलं. 

कठीम डाएट आणि जीम नको रे बाबा... 

वजन कमी करण्याची बाब कोणीच नाकारत नाही. पण, सध्या या साऱ्यासाठी घाई करत नसल्याचं नेहानं बोलताना स्पष्ट केलं. येत्या काळात आपण ध्यानधारणा आणि योगसाधना सुरु करणार असल्याचंही ती म्हणाली. सध्या सडपातळ होण्याची घाई नाही, हे तिनं अधोरेखित केलं. 

हेसुद्धा पाहा : रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Marda (@nehamarda)

दरम्यानच्या काळात मी शरीराला सक्रिय ठेवेन, चालण्याला प्राधान्य देऊन पण जीमला जाणार नाही. कठीण डाएट वगैरेही पाळणार नाही. किंबहुना माझं शरीर परत होतं तसंच कसं होईल याचीही मला सध्या चिंता नाही. कारण, सध्या प्राधान्यस्थानी मुलगी आहे आणि तिला स्तनपान करतानाही अनेकदा आईचं वजन नियंत्रणात येतं असं म्हणतात, हे कोणीतरी सांगितलेलं वाक्यही तिनं बोलून दाखवलं. किंबहुना याबाबतची खात्री नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. सरतेशेवटी वजन कमी करेन पण, आता त्याची काहीच घाई नाही असं म्हणत हेच मातृत्त्वातील सौंदर्य आहे हा एक सुरेख दृष्टीकोनही तिनं मांडला.