Photo: Ex Girlfriend च्या साखरपुड्याला या अभिनेत्याने लावली हजेरी, इमोशनल होऊन डोळ्यात आलं पाणी

ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Updated: Sep 9, 2022, 09:24 PM IST
 Photo: Ex Girlfriend च्या साखरपुड्याला या अभिनेत्याने लावली हजेरी, इमोशनल होऊन डोळ्यात आलं पाणी   title=

Krishna Mukherjee engagement: टीव्ही सीरियल 'ये है मोहब्बतें'मधील (Yeh Hai Mohabbatein) आलिया म्हणजेच कृष्णा मुखर्जी लग्नबंधनात अडकणार आहे. कृष्णा मुखर्जीने (Krishna Mukherjee) बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालासोबत (Chirag Bataliwala) एंगेजमेंट केली आहे. ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (television actress from popular serial yeh hai mohabbatein gets engaged with navy officer chirag batliwala ex boyfriend aly goni gets emotional)

विशेष बाब म्हणजे कृष्णा मुखर्जीच्या साखरपुड्यासाठी अनेक टीव्ही स्टार्सही सहभागी झाले होते ज्यांनी तिच्यासमवेत साखरपुड्यादिवशी खूप धम्माल तर केलीच पण तिच्यासोबत एकापेक्षा एक फोटो पोजही दिल्या. या सगळ्यांमध्ये अली गोनी (Aly Goni), जस्मिन भसीन, शिरीन मिर्झा आणि अरिजित तनेजा यांचा समावेश आहे. आणि मुख्य म्हणजे क्रिशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीही उपस्थित होता जो यावेळी भावूक झाला. 

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये कृष्णा मुखर्जी खूपच सुंदर दिसत होती. एंगेजमेंटच्या या खास प्रसंगी कृष्णा मुखर्जीने शोल्डर लेसचा पांढरा गाऊन घातला होता. 

कृष्णा मुखर्जी यांचे भावी पती चिराग बाटलीवाला नौदलात अधिकारी आहेत यावेळी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने नौदलाचा युनिफॉर्म घातला होता. कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भेट झाली होती. दोघेही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.

कृष्णा मुखर्जीबद्दल असे सांगितले जात आहे की त्यांची आणि चिराग बाटलीवाला 2023 मध्ये लग्न करणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कृष्णा आणि चिराग यांनीही कॅमेऱ्यासमोर त्यांची एक्गेजमेंट रिंग फ्लॉंट केली.  अली गोनी आणि जास्मिन भसीन यांनीही कृष्णा मुखर्जीच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. अली गोनी आणि कृष्णा मुखर्जी एकमेकांना डेट करत होते आता ते दोघे एकमेकांना आपले खास मित्र मानतात.