close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कौटुंबीक कलहातून सावरणाऱ्या अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

लवकरच अभिनेत्री छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Sep 15, 2019, 11:44 AM IST
कौटुंबीक कलहातून सावरणाऱ्या अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी गोष्टींमुळे चर्चेत आहे. अशातच आता छोट्या पडद्यावर श्वेता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे. श्वेता लवकरच एका आगामी शोमध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, श्वेता 'मेरे डॅड की दुल्हन' नावाच्या एका मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. श्वेताशिवाय या शोमध्ये टेलिव्हिजन अभिनेता वरुण बडोलाही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

अभिनेत्रीच्या दुसऱ्या पतीकडून मुलीचा विनयभंग; पहिल्या पतीची प्रतिक्रिया

रिपोर्टनुसार, हा शो एका वडील - मुलीच्या गोष्टींवर आधारित आहे. यातील मुलीला तिचे वडील एकटे असल्याची जाणीव होते आणि ती त्यांच्यासाठी एका योग्य जोडीदाराचा शोध सुरु करते. 

सावत्र वडिलांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीविषयी अभिनेत्रीच्या मुलीचा मोठा खुलासा

श्वेताने याआधी अनेक मालिकांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमध्ये श्वेताने साकारलेली 'प्रेरणा' ही व्यक्तीरेखा तुफान गाजली. त्या भूमिकेमुळे श्वेता घरांघरात पोहचली. त्यामुळे आता या शोमध्ये श्वेताची भूमिका कशी असेल? तिच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.