close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनेत्रीच्या दुसऱ्या पतीकडून मुलीचा विनयभंग; पहिल्या पतीची प्रतिक्रिया

मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी...   

Updated: Aug 13, 2019, 10:42 AM IST
अभिनेत्रीच्या दुसऱ्या पतीकडून मुलीचा विनयभंग; पहिल्या पतीची प्रतिक्रिया
राजा तिवारी

मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे आणि विविध मालिकांमुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रीला पुन्हा एकदा घरगुती हिंसेचा शिकार व्हावं लागलं आहे. इतकतच नव्हे, तर दुसऱ्या पतीकडून या अभिनेत्रीच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलीचा विनयभंगही करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. 

श्वेताने तिचा दुसरा पती आणि अभिनेता अभिनव कोहली, याच्याविरोधात पोलिसांत रितसर तक्रारही दाखल केली आहे. तिने अभिनववर विनयभंगाचा आरोप केला. ज्यानंतर भारतीय दंडसंविधानाच्या कलम ५०९, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ अशा कलमान्वये आणि आयटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ६७-अ अंतर्गत रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

श्वेतासोबत झालेला हा सर्व प्रकार आणि आपल्या मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी तिचा पहिला पती राजा चौधरी याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'मलाही माध्यमांमार्फतच याविषयीची माहिती मिळाली. मी माझ्या मुलीसोबत संपर्कात होतो आणि तिची भेटही घेतली', असं सांगत काळजी करु नका मी ठीक आहे हे पलकने स्पष्ट केलं. एक वडील म्हणून ही गोष्ट मन विचलित करणारी आहे, असं तो म्हणाल्याचं वृत्त 'बॉम्बे टाईम्स'ने प्रसिद्ध केलं आहे. 

राजासोबतच्या नात्यातही होतं वादळ 

राजासोबत विवाहबंधनात असतेवेळी श्वेता घरगुती हिंसेचा शिकार झाली होती. वैवाहिक आयुष्यात आलेल्या या वाळानंतर तिने राजासोबतच्या नात्यात वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोत घेतला होता. ज्यानंतर तिने अभिनेता अभिनव कोहली याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण, त्यांच्या नात्यातही गेल्या काही वर्षांपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सुरुवातीचा काही काळ या दोघांनीही नात्यात सारंकाही आलबेल असल्याचं सांगत वादाच्या चर्चा धुडकावल्या होत्या. पण, अखेर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.